 
						IREDA Share Price | IREDA म्हणजेच इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेवलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने देशातील अक्षय ऊर्जा प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी इंडियन ओव्हरसीज बँकेसह भागीदारी करार केला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही भागीदारीची बातमी येताच IREDA कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IREDA कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 125.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 16 जानेवारी रोजी IREDA कंपनीचे शेअर्स 127.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. IREDA कंपनीचा IPO नोव्हेंबर 2023 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. आज गुरूवार दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी IREDA स्टॉक 1.21 टक्के घसरणीसह 122.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
IREDA कंपनी आणि इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये झालेल्या करारावर IREDA कंपनीचे CMD प्रदीप कुमार दास आणि इंडियन ओव्हरसीज बँकेचे MD अजय कुमार श्रीवास्तव यांनी स्वाक्षरी केली. या करारानंतर IREDA कंपनीच्या CMD ने माहिती दिली की, IREDA कंपनीची ताकद आणि संसाधने एकत्र करून आम्ही भारतातील अक्षय ऊर्जा प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
या नवीन भागीदारीचा उद्देश कर्ज सिडिकेशन आणि अंडररेटिंग प्रक्रिया सुलभ करणे, IREDA कंपनीच्या कर्जासाठी विश्वास आणि धारणा तयार करणे हे कंपनीचे उद्देश्य आहे. प्रदीप कुमार दास म्हणाले की, हे सहकार्य बँक ऑफ बडोदा, बैंक ऑफ इंडिया, यूनियन बैंक ऑफ इंडिया, इंडिया इन्फ्रास्टक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड, बँक ऑफ महाराष्ट्रसह इतर आघाडीच्या वित्तीय संस्थासोबत IREDA कंपनीच्या यशस्वी भागीदारीवर आधारित आहे.
IREDA कंपनीचा आयपीओ नोव्हेंबर 2023 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. या कंपनीचे शेअर्स शेअर बाजारात लिस्ट झाल्यावर 100 टक्क्यांनी वाढले होते. IREDA कंपनीचा IPO 29 नोव्हेंबर 2023 रोजी 60 रुपये प्रति शेअर किमतीवर सूचीबद्ध झाला होता. या कंपनीचे शेअर्स आपल्या IPO मधील इश्यू किमतीच्या तुलनेत 87.5 टक्के वाढले होते. लिस्टिंगनंतर IREDA कंपनीचे शेअर्स सलग 11 ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढत होते.
IREDA ही एक नॉन-बैंकिंग फायनान्स कंपनी असुन तिची स्थापना 1987 साली झाली होती. IREDA कंपनी भारतीय नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करते. डिसेंबर 2023 तिमाहीत IREDA कंपनीच्या प्रवर्तकांकडे कंपनीचे 75 टक्के भाग भांडवल होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांकडे कंपनीचे एकूण 25 टक्के भाग भांडवल होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		