
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. आज या कंपनीचे शेअर्स किंचित तेजीसह वाढत आहे. मागील आठवड्यात सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारी या सरकारी कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 275 रुपये किमतीवर पोहचले होते. या कंपनीचे शेअर्स आपल्या 310 रुपये या सर्वकालीन उच्चांक किमतीच्या तुलनेत 13.22 टक्के खाली ट्रेड करत आहेत. ( आयआरईडीए कंपनी अंश )
शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5.71 टक्क्यांच्या वाढीसह 272.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 22 जुलै 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 0.033 टक्के वाढीसह 272.19 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील आठवड्यात आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण होण्याचे कारण म्हणजे जागतिक ब्रोकिंग फर्म फिलिप कॅपिटलने या सरकारी कंपनीची रेटिंग कमी केली आहे. नुकताच या कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. फिलीप कॅपिटल फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरईडीए कंपनीच्या कर्ज वितरणात 2024-26 पर्यंत 25 टक्के CAGR दराने वाढ होऊ शकते. मात्र शेअरची सध्याची कामगिरी पाहून अनेक तज्ञांनी स्टॉकवर ‘सेल’ रेटिंग जाहीर केली आहे.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉक मध्ये पुढील काळात जबरदस्त घसरण पाहायला मिळू शकते. आणि हा स्टॉक 130 रुपये किमतीवर येऊ शकतो. म्हणजेच आयआरईडीए स्टॉक सध्याच्या किंमतीच्या तुलनेत 50 टक्क्यांनी खाली येऊ शकतो. जून 2024 तिमाहीत आयआरईडीए कंपनीचा निव्वळ नफा 383 कोटी रुपये नोंदवला गेला होता.
या कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 30 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. जून तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 1501 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षी याच तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 1143.50 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.