
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आपण ज्या स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत, त्या कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( जीआरपी लिमिटेड कंपनी अंश )
मागील आठवड्यात शुक्रवारी बोनस शेअर्सची घोषणा करताच या कंपनीच्या शेअरची किंमत 5 टक्के वाढीसह 15034.50 रुपये किमतीवर पोहोचली होती. आपण ज्या स्टॉकबद्दल चर्चा करतोय, त्या कंपनीचे नाव आहे, जीआरपी लिमिटेड.
जीआरपी लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 3:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासह कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या शेअरधारकांना प्रति इक्विटी शेअर 37.50 रुपये लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. बोनस शेअर्स आणि लाभांश वाटप करण्यासाठी कंपनीने 27 जुलै 2024 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. या कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 14725 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 22 जुलै 2024 रोजी जीआरपी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.82 टक्के वाढीसह 15,200 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मागील सहा महिन्यांत जीआरपी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 172.83 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 1465.82 टक्के वाढवले आहेत. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 197.57 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 307 टक्के वाढली आहे.
मागील दोन वर्षात जीआरपी लिमिटेड स्टॉक 724.65 टक्के आणि गेल्या पाच वर्षात 1553.01 टक्के वाढला आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 30 टक्के वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या जर तुम्हाला भरघोस परतावा, मोफत बोनस शेअर्स आणि लाभांश हवा असेल तर जीआरपी लिमिटेड स्टॉक तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.