
IREDA Share Price | भारतीय शेअर बाजारात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर, भाजप पक्ष पुन्हा सत्तेत आला तर शेअर बाजारात मजबूत रॅली पाहायला मिळू शकते. मागील काही आठवड्यापासून परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफा वसुली केली आहे.
त्यामुळे सध्या शेअर बाजार बऱ्यापैकी खाली आला आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, सध्या शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. यासाठी तज्ञांनी मजबूत फंडामेंटल्स असलेले टॉप 3 शेअर्स निवडले आहे. यामध्ये Rites Ltd, IREDA आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे शेअर्स सामील आहेत. सध्या हे शेअर्स स्वस्त मुल्यांकनावर ट्रेड करत आहेत.
बँक ऑफ महाराष्ट्र :
तज्ञांनी पुढील एका 1 वर्षासाठी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा शेअर 85 रुपये किमतीवर जाऊ शकतो. या सरकारी बँकेची स्थापना 1935 साली झाली होती. देशभरात या बँकेने 2500 पेक्षा जास्त शाखा सुरू केल्या आहेत. आज गुरूवार दिनांक 30 मे 2024 रोजी हा स्टॉक 1.67 टक्के घसरणीसह 67.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे
राइट्स लिमिटेड :
तज्ञांनी पुढील एका 1 वर्षासाठी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा शेअर 1000 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 550 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज गुरूवार दिनांक 30 मे 2024 रोजी हा स्टॉक 0.90 टक्के घसरणीसह 709 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
IREDA :
तज्ञांनी पुढील एका 1 वर्षासाठी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा शेअर 240-280 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 135 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज गुरूवार दिनांक 30 मे 2024 रोजी हा स्टॉक 1.48 टक्के घसरणीसह 182.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.