4 May 2025 7:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SCSS Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच-फायदा, 12 लाख रुपये व्याज आणि 42 लाख रुपये परतावा मिळेल Post Office Scheme | कमाल आहे, ही योजना गुंतवणुकीवर देईल 40,68,209 रुपये परतावा आणि प्लस महिना 24,000 रुपये उत्पन्न HDFC Mutual Fund | पगारदारांनो! बिनधास्त गुंतवणूक करा, 12 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढेल, संपत्तीत मोठी वाढ होईल Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका Horoscope Today | 05 मे 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC
x

IREDA Share Price | शेअर प्राईस 32 रुपयांवरून 214 रुपयांवर पोहोचली, आता शेअर पुन्हा फोकसमध्ये आला - NSE: IREDA

IREDA Share Price

IREDA Share Price | गुरुवार, 09 जानेवारी 2025 रोजी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स चर्चेत होते. गुरुवारी इरेडा कंपनी शेअर 4.08 टक्क्यांनी घसरून 214.26 रुपयांवर पोहोचला होता. सकाळी इरेडा शेअर तेजीत होता, मात्र शेअर बाजारातील नकारात्मक संकेतानंतर पुन्हा घसरण झाली होती.

इरेडा कंपनीने महत्वाची अपडेट दिली

सकाळच्या तेजीला महत्वाची अपडेट कारणीभूत ठरली होती. इरेडा कंपनीने स्टॉक एक्सचेंजला अपडेट देताना सांगितले आहे की, ‘इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनीने सामंजस्य कराराच्या कामगिरीत सलग चौथ्या वर्षी ‘उत्कृष्ट’ मानांकन प्राप्त केले आहे. तसेच इरेडा कंपनी ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे.

इरेडा कंपनीने बिझनेस अपडेट जाहीर केली

1 जानेवारी रोजी इरेडा कंपनीने बिझनेस अपडेट देताना म्हटले होते की, ‘डिसेंबर तिमाहीत इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनीचे कर्ज वाटप एकूण ४१ टक्क्यांनी वाढून १७,२३६ कोटी रुपयांवर पोहोचले होते. कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, इरेडा कंपनीने तिसऱ्या तिमाहीत म्हणजे सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत एकूण ३१,०८७ कोटी रुपयांची कर्ज मंजूर केले, जे मागील वर्षीच्या याच कालावधीतील १३,५५८ कोटी रुपयांच्या तुलनेत वार्षिक आधारावर १२९ टक्क्यांनी अधिक आहे.

विशेष म्हणजे इरेडा कंपनीकडून कर्जाच्या वितरणातही लक्षणीय वाढ झाली असून. म्हणजे मागील वर्षीच्या याच तिमाहीतील १२,२२० कोटी रुपयांच्या तुलनेत ती ४१ टक्क्यांनी अधिक आहे. कर्ज वितरणाचा एकूण आकडा १७,२३६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसेच थकित लोन-बुक ३६ टक्क्यांनी वाढून ६९,००० कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील वर्षी ५०,५८० कोटी रुपये होते.

कंपनी आयपीओ शेअरची किंमत ३२ रुपये होती

गेल्या वर्षभरात इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनी शेअरने ११५ टक्के परतावा दिला आहे. या वर्षभरात इरेडा शेअरची किंमत १०३ रुपयांवरून वधारून 218.49 रुपयांवर पोहोचली आहे. इरेडा कंपनीचा आयपीओ नोव्हेंबर २०२३ मध्ये लाँच करण्यात आला होता. त्यावेळी इरेडा कंपनीने ३२ शेअर प्राईस बँड निश्चित केली होती. त्या आयपीओ किंमतीपासून इरेडा शेअर जवळपास ६१० टक्क्यांनी वधारला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IREDA Share Price Thursday 09 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या