14 December 2024 11:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

PPF Calculator SBI | सुरक्षित गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याजाचा फायदा, SBI पीपीएफ खातं का आहे लोकांची पसंती?

PPF Calculator SBI

PPF Calculator SBI | खाजगी नोकरी करणारे बहुतांश लोक आपला पैसा पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात (पीपीएफ) गुंतवणे पसंत करतात. त्यावर चक्रवाढ व्याज मिळते. त्यात जास्तीत जास्त गुंतवणूक करून २५ वर्षांच्या कालावधीत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी उभारता येतो. पीपीएफवर सरकार वार्षिक ७.१ टक्के दराने व्याज देत आहे.

हे खाते तुम्ही कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून उघडू शकता. आता एसबीआयचे ग्राहक त्यांच्या मोबाइल बँकिंग किंवा इंटरनेटद्वारे त्यांचे पीपीएफ खाते ऑनलाइन उघडू शकतात. मात्र, बचत खात्याचे केवायसी असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानंतरच तुम्ही ऑनलाइन पीपीएफ खाते उघडू शकता.

एसबीआयमध्ये पीपीएफ खाते कसे उघडावे
यासाठी सर्वप्रथम आपल्या युजरनेम आणि पासवर्ड पासवर्डच्या मदतीने आपल्या एसबीआय खात्यात लॉगिन करा. येथे आपल्याकडे रिक्वेस्ट अँड इन्क्वायरीचा टॅब असेल. त्यावर क्लिक करावं लागेल. यानंतर ड्रॉपडाउन मेनूमधून नवीन पीपीएफ अकाउंटवर क्लिक करा.

यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजमध्ये तुम्हाला पॅन डिटेल्स आणि इतर डिटेल्स टाकावी लागतील. यानंतर तुम्हाला ब्रांच कोड टाकावा लागेल. यामध्ये तुम्हाला ज्या शाखेत तुमचे पीपीएफ खाते उघडायचे आहे तो ब्रांच कोड टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती टाकावी लागेल, त्यानंतर प्रोसीडवर क्लिक करावं लागेल.

यानंतर आता तुम्हाला दिलेल्या रेफरन्स नंबरसह फॉर्म डाऊनलोड करावा लागेल. यानंतर तुम्ही ‘प्रिंट पीपीएफ ऑनलाइन अॅप्लिकेशन’ टॅबवरून खाते उघडण्याचा फॉर्म प्रिंट करा. शाखेत जाऊन ३० दिवसांच्या आत केवायसी कागदपत्रे आणि छायाचित्रांसह फॉर्म सबमिट करावा.

एसबीआय खात्याशी आधार क्रमांक जोडला जावा
तुमचा आधार क्रमांक तुमच्या एसबीआय बचत खात्याशी जोडला गेला पाहिजे. हे खाते उघडण्यासाठी किमान ५०० रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. एका आर्थिक वर्षात तुम्ही कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक करू शकता.

पीपीएफ खाते १५ वर्षांत परिपक्व होते. त्यानंतर तुम्ही ते 5-5 वर्षांसाठी वाढवू शकता. खाते उघडल्यानंतर 5 वर्षांपर्यंत तुम्ही या खात्यातून पैसे काढू शकत नाही. मात्र, जर तुम्ही वयाच्या 15 व्या वर्षापूर्वी या खात्यातून पैसे काढले तर तुमच्या फंडातून 1% रक्कम कापली जाईल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : PPF Calculator SBI Interest rate check details on 20 October 2023.

हॅशटॅग्स

#PPF Calculator SBI(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x