
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आज या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. नुकताच आयसीआयसीआय डायरेक्ट फर्मने या कंपनीच्या शेअर्सला ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील 12 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 250 रुपये किमतीवर जाऊ शकतात. ( आयआरईडीए कंपनी अंश )
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 7 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह ट्रेड करत होते. दिवसभरात हा स्टॉक 209.85 रुपये किमतीवर पोहचला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 215 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 49.99 रुपये होती.
आज बुधवार दिनांक 3 जुलै 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 4.71 टक्के वाढीसह 215.03 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जानेवारी 2024 या एका महिन्यात आयआरईडीए स्टॉक 77 टक्के वाढला होता. 2024 या वर्षात आतापर्यंत हा स्टॉक 90 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 43 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. फेब्रुवारी 2024 या महिन्यात आयआरईडीए स्टॉक 17.5 टक्क्यांनी घसरला होता. तर मार्च महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 9.4 टक्क्यांनी घसरली होती.
आयआरईडीए कंपनीचा IPO नोव्हेंबर 2023 मध्ये लाँच करण्यात आला होता. या कंपनीच्या आयपीओमध्ये शेअर्सची किंमत बँड 32 रुपये प्रति शेअर जाहीर करण्यात आली होती. IPO किमतीच्या तुलनेत या कंपनीचे शेअर्स 509 टक्के वाढले आहेत. आयआरईडीए या सरकारी कंपनीची स्थापना 1987 साली झाली झाली. या कंपनीत भारत सरकारने एकूण 75 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.