
IRFC Share Price | मागील आठवड्यात स्टॉक मार्केट सलग पाच दिवस घसरला होता. याचा परिणाम इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअरवर देखील पाहायला (NSE: IRFC) मिळाला होता. दरम्यान, मल्टिबॅगर IRFC शेअरसाठी तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला. तसेच IRFC शेअरची पुढची टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे. (आयआरएफसी लिमिटेड कंपनी अंश)
शेअरची सध्याची स्थिती
शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी IRFC लिमिटेड कंपनी शेअर 2.93 टक्के घसरून 134.95 रुपयांवर पोहोचला होता. सोमवार 28 ऑक्टोबर रोजी हा शेअर 5.24 टक्के वाढून 141.48 रुपयांवर पोहोचला होता.
शेअर टार्गेट प्राईस
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी IRFC शेअरसंदर्भात सल्ला देताना सांगितले की, ‘मागील काही दिवस IRFC शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे सध्या IRFC लिमिटेड कंपनी शेअर ज्या स्तरावर ट्रेड करत आहे, ती लेव्हल सपोर्ट झोन आहे. त्यामुळे पुढील ३-४ महिन्यांचा कालावधीसाठी १३०-१४० रुपये प्राईसवर सपोर्ट झोन तयार होईल.
IRFC लिमिटेड कंपनी शेअरमध्ये मिडियम टर्म आणि प्राइस सेटअपमुळे पुढील 3 ते 4 महिन्यांत पूलबॅक होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसे झाल्यास IRFC लिमिटेड कंपनी शेअर १६५ ते १७० रुपयांच्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकतो. मात्र लॉन्ग टर्म मध्ये मोठी तेजीची संकेत नसल्याने गुंतवणूकदारांनी १६५-१७० रुपयांवर प्रॉफिट-बुक करून बाहेर पडावे. तसेच 118 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवावा असा सल्ला देखील तज्ज्ञांनी दिला आहे.
मल्टिबॅगर परतावा दिला
मागील ६ महिन्यात IRFC लिमिटेड कंपनी शेअर 16.13% घसरला आहे. मागील १ वर्षात IRFC लिमिटेड कंपनी शेअरने 87.56% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 444.15% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 34.41% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.