
IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी कंपनीचे शेअर्स मंगळवारी 1.80 टक्क्यांच्या वाढीसह 176.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आयआरएफसी ही कंपनी भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली व्यवसाय करणारी कंपनी आहे. ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी अंश )
आयआरएफसी ही कंपनी देशांतर्गत आणि परदेशी भांडवली बाजारातून निधी उभारण्याचे काम करणारी भारतीय रेल्वेची समर्पित वित्त शाखा आहे. आज गुरूवार दिनांक 13 जून 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 0.57 टक्के घसरणीसह 176.67 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअर बाजारातील तज्ञांनी आयआरएफसी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, JWL, Texmaco Rail आणि Titagarh Wagons या रेल्वे स्टॉकमध्ये देखील चांगली व्हॉल्यूम पाहायला मिळत आहे. गुंतवणूक सल्लागारांच्या मते, आयआरएफसी स्टॉक पुढील एक ते दीड महिन्यांत 190 रुपये किमतीवर जाऊ शकतो. एकदा हा स्टॉक 190 रुपये किमतीच्या पार गेला तर शेअर 240 रुपये ते 260 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
आयआरएफसी कंपनीच्या संचालक मंडळाने 31 मार्च 2024 रोजी आपल्या शेअरधारकांना प्रति इक्विटी शेअर 0.70 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. 2 नोव्हेंबर 2023 रोजी देखील कंपनीने गुंतवणुकदारांना 0.80 रुपये प्रति इक्विटी शेअर अंतरिम लाभांश वाटप केला होता. 2023-24 या संपूर्ण आर्थिक वर्षासाठी आयआरएफसी कंपनीने आपल्या 10 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअरवर 1.50 रुपये लाभांश वाटप केला होता. हा लाभांश कंपनीच्या एजीएमच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा करण्यात आला.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.