
Stocks To Buy | सध्या शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत, कोणत्या स्टॉकमधे गुंतवणूक करावी याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र ग्लोबल कॅपिटल मार्केट्स फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूकदारांना IRFC कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. IRFC स्टॉकने टेक्निकल चार्टवर 38-40 रुपयांची सपोर्टेड किंमत पातळी पार केली आहे.
तज्ज्ञांच्या मते अशा स्थितीत हा स्टॉक पुढील 4-6 महिन्यांत 60-75 रुपये किंमत पातळी स्पर्श करू शकतो. म्हणजेच गुंतवणूकदारांना सध्याच्या किमतीच्या तुलनेत 50-60 टक्क्यांनी अधिक नफा मिळू शकतो. तज्ञांनी IRFC स्टॉक 38 रुपयेच्या खाली आल्यावर आणखी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी IRFC कंपनीचे शेअर्स 2.10 टक्के घसरणीसह 39.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मजबूत परतावा देईल :
शेअर बाजारातील तज्ज्ञांनी गुंतवणुकदारांना IRFC स्टॉकमध्ये 36 रुपयेचा स्टॉपलॉप लावून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काही महिन्यांत हा शेअर 60 ते 75 रुपये किंमत स्पर्श करू शकतो, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 21.07 टक्के नफा कमावून दिला आहे. IRFC ही कंपनी मुख्यतः रेल्वे प्रकल्पांना वित्त पुरवठा करण्याचा व्यवसाय करते.
शेअर परतावा :
स्टॉक एक्सचेंज डेटानुसार, मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये IRFC कंपनीच्या स्टॉकने लोकांना 12.96 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 27.29 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात IRFC कंपनीच्या शेअरने लोकांना 86.15 टक्के नफा कमावून दिला आहे. IRFC कंपनीचे एकूण बाजार भांडवल 53,000 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक परकी किंमत 41.70 रुपये होती. तर नीचांक पत्की किंमत 20.80 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.