
Jai Balaji Share Price | मागील 3 वर्षांत जय बालाजी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 16 रुपये किमतीवरून 624 रुपये किमतीवर पोहचले आहेत.
मागील काही दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स सातत्याने अप्पर सर्किट हीट करत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होता. ऑक्टोबर 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स 15.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
शुक्रवारी जय बालाजी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 624.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 625.05 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या जवळ पोहचली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल मार्केट 10,024.93 कोटी रुपये आहे.
मागील 6 महिन्यांत जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1100 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याचबरोबर ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीचे शेअर्स एक वर्षापूर्वी खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 1300 टक्क्यांनी वाढले आहे.
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के नफा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये 3 वर्षापूर्वी 10000 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 4 लाख रुपये झाले आहे. तीन वर्षांपूर्वी जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.