 
						JFSL Share Price | मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या नवीन कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअरमधे घसरगुंडी सुरू आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स लिस्टिंगच्या दिवशी घसरले होते. या कंपनीचे शेअर्स लिस्टिंगनंतर BSE आणि NSE इंडेक्सवर 5 टक्के लोअर सर्किटमध्ये अडकले आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील हा स्टॉक लोअर स्टॉकमध्ये अडकला आहे.
आज देखील जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले होते. आणि स्टॉक 239.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 224.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील महिन्यात एका विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सची किंमत 261.85 रुपये निश्चित करण्यात आली होती. या कंपनीचे बाजार भांडवल 1,51,970.56 रुपये आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी विलग करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1:1 या प्रमाणात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स वाटप केले होते. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना एका शेअरवर जिओ फायनान्शियल कंपनीचा एक शेअर फ्रीमध्ये दिला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या गुंतवणूकदारांना जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर्स मोफतमध्ये मिळाले आहेत.
नुकताच जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने म्युच्युअल फंड उद्योगात प्रवेश करण्यासाठी BlackRock कंपनीसोबत 50:50 भागीदारीत जॉइंट वेंचर स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत दोन्ही कंपन्या 150 दशलक्ष डॉलर्सची प्रारंभिक गुंतवणूक करून JV स्थापन करणार आहे.
डिमर्जर प्रक्रियेचा वापर करून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही कंपनी मागील महिन्यात रिलायन्स कंपनीपासून वेगळी करण्यात आली होती. किंमत निश्चित केल्यानंतर कंपनीने ‘डमी’ म्हणून स्टॉक सूचीबद्ध केले होते, मात्र त्यांची ट्रेडिंग थांबवली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		