11 May 2024 8:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा पॉवर शेअर्समध्ये इतकी तेजी का आली? नेमकं काय कारण? शेअरची नवी टार्गेट प्राईस किती?

Tata Power Share Price

Tata Power Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स काल 242.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 4.07 टक्के वाढीसह 239.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स मार्च 2023 च्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 31 टक्के मजबूत झाले आहेत. 28 मार्च 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 182.45 रुपये या आपल्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते.

टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स मागील एका महिन्यात 10 टक्के, 3 महिन्यात 16.30 टक्के आणि 6 महिन्यात 15.13 टक्के वाढले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 2.86 टक्के वाढली आहे. आज बुधवार दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 0.47 टक्के वाढीसह 244.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

टाटा पॉवर कंपनीने नुकताच एका नवीन करारावर स्वाक्षरी केली असल्याची माहिती दिली आहे. टाटा पॉवर कंपनीने Tata Power Renewable Energy Limited या आपल्या उपकंपनीसोबत मिळून उत्तराखंडमधील टाटा मोटर्सच्या पंतनगर प्लांटसोबत वीज खरेदी करार केला आहे. हा सोलर पॉवर प्लांट उत्तराखंड राज्यातील सर्वात मोठा सोलर पॉवर प्लांट असेल. या प्रकल्पाचे काम पुढील सहा महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे. टाटा पॉवर कंपनीने जून 2023 तिमाहीमध्ये 22 टक्के वाढीसह 972.5 कोटी रुपये नफा कमावला आहे.

मागील आर्थिक वर्षाच्या याच जून तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 784.6 कोटी रुपये नफा कमावला होता. मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने 14,495.5 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जो आता जून 2023 तिमाहीत 5 टक्के वाढला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 15.213.3 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

जून 2022 तिमाहीत टाटा पॉवर कंपनीचा EBITDA 1683.4 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तो आता जून 2023 तिमाहीत 75 टक्के वाढीसह 2,943.6 कोटी रुपयेवर पोहचला आहे. प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांच्या मते टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये होणारी वाढ अपेक्षित आहे. मात्र तज्ञांक्या स्टॉकची लक्ष्य किंमत 252-254 रुपये निश्चित केली आहे. दीर्घ काळासाठी गुंतवणुकदारांना लोकांसाठी तज्ञांनी पॉवर स्टॉकवर 281 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

Tips 2 Trades फर्मच्या तज्ञांच्या मते टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 255 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. एसएमसी ग्लोबल फर्मने टाटा पॉवर स्टॉकवर 255-259 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आणि तज्ञांनी गुंतवणूक करताना 215 रुपयेवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Tata Power Share Price today on 23 August 2023

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(81)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x