
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर्स 5.14 टक्क्यांच्या वाढीसह 351 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्के अप्पर सर्किट लागला आहे. ( जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी अंश )
जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर्स 204.65 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवरून 71.51 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. आज मंगळवार दिनांक 12 मार्च 2024 रोजी जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर्स 4.86 टक्के वाढीसह 372.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जिओ फायनान्शियल कंपनीची पूर्ण मालकी रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्स लिमिटेड कंपनीने धारण केली आहे. नुकताच जिओ फायनान्शिअल कंपनीने आपल्या पूर्ण मालकीच्या Jio इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीमधील 100 टक्के इक्विटी स्टेक रिलायन्स स्ट्रॅटेजिक बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड कंपनीला एकूण 0.92 कोटी रुपयेला विकले आहेत.
डीआरएस फिनव्हेस्ट फर्मच्या तज्ञांच्या मते, जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर्स दैनिक चार्टवर मजबूत वाढीचे संकेत देत आहेत. पुढील काही दिवसात या कंपनीचे शेअर्स 380 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. तज्ञांनी या स्टॉकमधून कमाई करण्यासाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र गुंतवणूक करताना तज्ञांनी 325 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याची शिफारस केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.