1 May 2025 12:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE
x

JP Associates Share Price | 22 रुपयाचा मल्टिबॅगर जयप्रकाश असोसिएट्स शेअर तेजीत, आता तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

JP Associates Share Price

JP Associates Share Price | जयप्रकाश असोसिएट्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.75 टक्के वाढीसह 23.19 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील तीन ट्रेडिंग सेशनपासून जयप्रकाश असोसिएट्स कंपनीचे शेअर्स बंपर तेजीत वाढत आहेत.

मागील सहा महिन्यांत जयप्रकाश असोसिएट्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 160 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 99.09 टक्के मजबूत झाले आहेत. मागील पाच वर्षांत जयप्रकाश असोसिएट्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 210.64 टक्के परतावा कमावून दिला आहे. बुधवार दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी जयप्रकाश असोसिएट्स स्टॉक 2.07 टक्के वाढीसह 22.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जानेवारी 2008 रोजी जयप्रकाश असोसिएट्स कंपनीचे शेअर्स 280 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र त्यानंतर या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात आले. 2008 पासून आतापर्यंत या कंपनीचे शेअर्स तब्बल 92 टक्के घसरले आहे. सध्या जयप्रकाश असोसिएट्स कंपनीवर 29,037 कोटी रुपये कर्ज आहे. हे कर्ज परतफेड करण्याची मुदत 2037 रोजी संपेल. त्या तुलनेत 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत कंपनीवर 4,193 कोटी रुपये थकीत कर्ज होते.

जयप्रकाश असोसिएट्स कंपनीने 29,037 कोटी रुपये कर्जापैकी 18,518 कोटी रुपये कर्ज प्रस्तावित स्पेशल पर्पज व्हेईकलकडे हस्तांतरित केले तर कंपनीच्या कर्जत लक्षणीय घट पाहायला मिळू शकते. मात्र यासाठी एनसीएलटीने अद्याप मंजुरी दिलेली नाहीये.

ICICI बँकेने जयप्रकाश असोसिएट्स कंपनीला 3,000 कोटी रुपये कर्ज दिली आहे. जयप्रकाश असोसिएट्स ही कंपनी मुख्यतः सिमेंट, बांधकाम, हॉटेल्स आणि रिअल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करते. तज्ञांच्या मते, जयप्रकाश असोसिएट्स कंपनीच्या शेअरमध्ये 21 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. तर 25 रुपये किमतीवर रेझिस्टन्स पाहायला मिळू शकतो. तज्ञांच्या मते, पुढील काही महिन्यांत जयप्रकाश असोसिएट्स स्टॉक 16 ते 30 रुपये ट्रेडिंग रेंजमध्ये व्यवहार करेल.

जयप्रकाश असोसिएट्स स्टॉक दैनंदिन चार्टवर 25.3 रुपये किमतीवर प्रतिकारासह जास्त खरेदी केले गेले आहेत. सध्याच्या किंमत पातळीवर गुंतवणूकदारांनी नफा बुक केला पाहिजे असे तज्ञांचे मत आहे. कारण हा स्टॉक दैनिक सपोर्टच्या खाली 21 रुपये किमतीवर येण्याची शक्यता आहे आणि पुढील काळात हा स्टॉक घसरून 16 रुपये किंमत देखील स्पर्श करू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JP Associates Share Price NSE 13 December 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

JP Associates Share Price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या