
JP Associates Share Price | जेपी ग्रुपचा भाग असलेल्या जयप्रकाश असोसिएट्स कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्के वाढीसह 20.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. जयप्रकाश असोसिएट्स कंपनीने नुकताच ICICI बँकेसोबत एक करार केला आहे. त्यामुळे या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत होते.
मागील 6 महिन्यांत जेपी असोसिएट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 189 टक्के परतावा कमावून दिला आहे. जेपी असोसिएट्स कंपनीने ICICI बँकेला आपले 360 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स हस्तांतरित केले आहे. कंपनीने आपले कर्ज कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. आज शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी जेपी असोसिएट्स स्टॉक 0.99 टक्के घसरणीसह 20.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जेपी असोसिएट्स कंपनीने आणि तिच्या ट्रस्टने जवळपास 189 दशलक्ष शेअर्स ICICI बँकेकडे दिले आहेत. या हस्तांतरित शेअर्सचे एकूण बाजार मुल्य 360 कोटी रुपये आहे. जेपी असोसिएट्स कंपनीने कर्ज सेटलमेंट समझोता करारांतर्गत या सर्व शेअर्सचे हस्तांतरण केले आहे. हे हस्तांतरित केलेले शेअर्स कंपनीने पूर्वी ICICIE बँकेकडे तारण ठेवले होते.
जेपी असोसिएट्स आणि ICICI बँकेने हा कर्ज सेटलमेंट समझोता करार जेपी असोसिएट्स कंपनीच्या दिवाळखोरी याचिकेच्या सुनावणी पूर्वी केला आहे. या कंपनीची दिवाळखोरी याचिकेची सुनावणी 30 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे.
मागील 6 महिन्यांत जेपी असोसिएट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 189 टक्के परतावा कमावून दिला आहे. जयप्रकाश असोसिएट्स कंपनीचे शेअर्स 19 मे 2023 रोजी 6.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 15 नोव्हेंबर 2023 रोजी जेपी असोसिएट्स कंपनीचे शेअर्स 20.16 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 15 नोव्हेंबर 2023 रोजी जेपी असोसिएट्स कंपनीचे शेअर्स 20.75 रुपये किमतीवर पोहचले होते.
मागील एका महिन्यात जेपी असोसिएट्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 71 टक्के परतावा कमावून दिला आहे. 16 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 11.81 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर 15 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 20.16 रुपये किमतीवर पोहोचले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.