
JP Power Share Price | जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स मंगळवारी अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. मंगळवारी हा स्टॉक 5 टक्के वाढीसह 18.72 रुपये किमतीवर (NSE: JPPOWER) ओपन झाला होता. 2024 या वर्षात जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीवरून 68 टक्के घसरले आहेत. मार्केट ओपनिंगच्या पहिल्या 8 मिनिटांत जेपी पॉवर कंपनीचे 1.8 कोटी शेअर ट्रेड झाले होते. मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 19.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनी अंश)
जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स स्टॉकचा परतावा
22 एप्रिल 2005 रोजी या कंपनीचे शेअर्स 30.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या या कंपनीचे शेअर्स 19.15 किमतीवर ट्रेड करत आहेत. 4 जानेवारी 2008 रोजी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स 137.10 रुपये किमतीवर पोहोचले होते. त्यानंतर एकवेळ अशी आली होती की हा स्टॉक 4 रुपये किमतीपर्यंत घसरला होता.
मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स 30 टक्के वाढले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक किंमत पातळी 24 रुपये आणि नीचांकी किंमत 8.35 रुपये होती.
जेपी असोसिएट्स शेअर प्राईस
जेपी असोसिएट्स कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या 20 वर्षांपूर्वीच्या किमतीवर आले आहे. 18 जानेवारी 2004 रोजी या कंपनीचे शेअर्स 12.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एकेकाळी हा स्टॉक 300 रुपये किमतीवर पोहोचला होता. मागील 8 वर्षांत या कंपनीचे शेअर्स 6 ते 10 रुपये किमतीवर आले आहे.
मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 44 टक्के वाढले होते. 2024 या वर्षात जेपी असोसिएट्स स्टॉक 68 टक्के घसरला आहे. मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी जेपी असोसिएट्स कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 6.72 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.