 
						JP Power Share Price | जेपी ग्रुपचा भाग असलेल्या जयप्रकाश असोसिएट्स कंपनीने पुढील 2 वर्षात 10,000 कोटी रुपये कर्ज परतफेड करण्याची घोषणा केली आहे. आणि कर्ज देणाऱ्या बँकांनी देखील या कंपनीच्या कर्ज पुनर्रचनेला मंजुरी दिली आहे. बँकेने ब्लॉक बँकिंग मर्यादा 600 कोटी रुपये सोडली आहे. JP Associates Share Price
मागील सहा महिन्यांपासून जेपी असोसिएट्स आणि जेपी पॉवर व्हेंचर्स या दोन्ही कंपन्याच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. जयप्रकाश असोसिएट्स या कंपनीला 34 बँकांच्या कन्सोर्टियमने कर्ज दिले होते. आता ही कंपनी आपले सर्व कर्ज पुढील दोन वर्षात परतफेड करेल. शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी जयप्रकाश असोसिएट्स 0.27 टक्के घसरणीसह स्टॉक 18.45 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. तर जेपी पॉवर व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स 1.04 टक्के घसरणीसह 14.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मीडिया रिपोर्ट नुसार, जयप्रकाश असोसिएट्स कंपनी आपल्या मूळ कर्जाची परतफेड़ 2037 मध्ये करणार आहे. कर्जाची लवकरात लवकर परतफेड करता यावी म्हणून कंपनीने कामकाज सुरू करण्यास परवानगी देण्याची परवानगी मागितली आहे.
जेपी ग्रुपला विविध 34 बँकांच्या कन्सोर्टियमने कर्ज दिले होत. आता या बँकांनी देखील कंपनीच्या कर्ज परतफेडीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. ICICI बँक आणि SBI ने या दोन्ही कंपनीविरुद्ध दिवाळखोरीची कार्यवाही सुरू करावी, असा प्रस्ताव राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण समोर मांडला होता.
मागील 6 महिन्यांत जेपी असोसिएट्स आणि जेपी पॉवर कंपनीच्या शेअरची किंमत जबरदस्त वाढली आहे. मागील 6 महिन्यात जेपी असोसिएट्स कंपनीचे शेअर्स तब्बल 160 टक्के वाढले आहेत. 10 मे 2023 रोजी जेपी असोसिएट्स कंपनीचे शेअर्स 7.36 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 10 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.35 रुपये किमतीवर पोहोचले आहेत.
मागील 6 महिन्यात जेपी पॉवर व्हेंचर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 155 टक्के परतावा कमावून दिला आहे. 10 मे 2023 रोजी जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स 5.78 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 10 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 15.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		