14 May 2024 8:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स सलग 8 दिवस तेजीत, शेअर किमतीच्या वाढीचे कारण काय? पुढे किती फायदा होईल?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स गुरुवार दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी मजबूत तेजीत वाढत होते. सलग आठव्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक स्टॉक हिरव्या निशाणीवर क्लोज झाला आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 1.95 टक्क्यांच्या वाढीसह 18.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. येस बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 24.75 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 14.40 रुपये होती. येस बँकेचे एकूण बाजार भांडवल 52.80 कोटी रुपये आहे.

26 ऑक्टोबर 2023 पासून येस बँकेच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 15 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 7.33 टक्के परतावा दिला आहे. तर 2023 या वर्षात येस बँकेचे शेअर्स 10.91 टक्के वाढले आहेत. शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी येस बँक स्टॉक 0.27 टक्के वाढीसह 18.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

टेक्निकल एनालिस्ट्सच्या मते, येस बँक स्टॉकमध्ये 19-20 रुपये किमतीवर प्रतिकार पाहायला मिळत आहे. पुढील काळात हा स्टॉक ही प्रतिकार किंमत पार करू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. येस बँकेने नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले होते.

यात तिमाहीत येस बँकेचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 47 टक्क्यांनी वाढून 225 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. येस बँकेचा मालमत्तेवरील परतावा तिमाही दर तिमाही 0.4 टक्क्यांनी घसरला असून 0.2 टक्क्यांवर आला आहे.

ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, कॉमन इक्विटी टियर 1, कर्ज-ठेव प्रमाण, नेट NPA, CASA यांसारख्या प्रमुख मापदंडांवर बँकेची कामगिरी सकारात्मक आहे. तथापि बँकेची ऑपरेटिंग कमाई म्हणजे प्री प्रोव्हिजन ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये फारसा बदल पाहायला मिळाला नाही.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE 11 November 2023.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x