 
						K&R Rail Engineering Share Price | के अँड आर रेल इंजीनियरिंग कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षात आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये के अँड आर रेल इंजीनियरिंग कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 700 रुपये किमतीवर क्लोज झाले होत. के अँड आर रेल इंजीनियरिंग कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,346.31 कोटी रुपये आहे.
ही कंपनी भारतातील अग्रगण्य रेल्वे पायाभूत विकास करणाऱ्या कंपन्यांपैकी एक मानली जाते. परताव्याच्या बाबतीत या कंपनीच्या शेअरने बुलेट ट्रेनचे गतीला देखील मागे सोडले आहे. शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी के अँड आर रेल इंजीनियरिंग कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 734.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील 3 वर्षांत शेअरने 4,514 टक्के परतावा दिला
20 मार्च 2020 रोजी के अँड आर रेल इंजीनियरिंग कंपनीचे शेअर्स 15.17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 700 रुपयांच्या पार गेला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 4,514.37 टक्के परतावा कमावून दिला आहे.
जर तुम्ही 20 मार्च 2020 रोजी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4,514.37 टक्के वाढून 46 लाख रुपये झाले असते.
मागील एका वर्षात शेअरने 2413 टक्के परतावा दिला
मागील एका महिन्यात के अँड आर रेल इंजीनियरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 22.04 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात के अँड आर रेल इंजीनियरिंग कंपनीच्या शेअरने लोकांना 969.52 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 2413.46 टक्के परतावा कमावून दिला आहे.
जर तुम्ही एक वर्षापुर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये एका वर्षापुर्वी 1 लाख रुपये लावले असते तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2,400 टक्के वाढीसह 25 लाख रुपये झाले असते. जर तुम्ही 2023 या वर्षाच्या सुरुवातीला के अँड आर रेल इंजीनियरिंग कंपनीचे शेअर्स खरेदी केले असते, तर आता तुमचे 1 लाख रुपये वाढून 10 लाख रुपये झाले असते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		