
Kaka Industries IPO | सध्या शेअर बाजारात असेन कंपन्यांचे IPO लाँच होत आहेत. यात आणखी एका नावाची भर पडली आहे. काका इंडस्ट्रीज लिमिटेडचा (Kaka Share Price) SME IPO सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी गुंतवणूकीसाठी खुला केला जाणार आहे. काका इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO चा आकार 21.23 कोटी रुपये असणार आहे. बुधवार दिनांक 12 जुलै 2023 पर्यंत हा IPO गुंतवणुकीसाठी खुला राहील. चला तर मग जाणून घेऊ काका इंडस्ट्रीज IPO बद्दल सविस्तर (Kaka Industries Share Price)
1. काका इंडस्ट्रीज कंपनीचा IPO सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी ते बुधवार दिनांक 12 जुलै 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहील. गुरुवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी हा स्टॉक BSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध केला जाईल.
2. काका इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 55 ते 58 रुपये प्रति इक्विटी निश्चित केली आहे.
3. काका इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO मध्ये 10 रुपये दर्शनी मूल्याचे 3,660,000 फ्रेश इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकून 21.23 कोटी रुपये भांडवल उभारण्यात येणार आहे.
4. काका इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO मध्ये एका लॉटमध्ये 2,000 शेअर्स जारी केले जाणार आहे.
5. सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी स्टॉक सूचीबद्ध केला जाईल. आणि मंगळवार दिनांक 18 जुलै रोजी पासून परतावा मिळायला सुरुवात होईल.
6. काका इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO मध्ये बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ला IPO रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर हेम सिक्युरिटीज लिमिटेड यांना प्रमुख व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
7. IPO स्टॉक सूचीबद्ध झाल्यावर काका इंडस्ट्रीज कंपनीमधील प्रमोटर कडील भाग भांडवल 95.32 टक्के वरून कमी होऊन 69.78 टक्केवर येणार आहे. कंपनीचे प्रवर्तक राजेश धीरूभाई गोंडालिया, भाविन राजेशभाई गोंडालिया, राजेशकुमार धीरूभाई गोंडालिया हे आहेत.
8. कंपनीच्या IPO मध्ये 44.96 टक्के शेअर्स पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव असतील. 13.55 टक्के शेअर्स गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असतील. 31.52 टक्के शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारासाठी आणि उर्वरित 4.98 टक्के मार्केट मैकर्ससाठी राखीव असतील.
कंपनीबद्दल थोडक्यात :
काका इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः पार्टीशन, फॉल्स सीलिंग, वॉल पॅनेलिंग, किचन कॅबिनेट, दरवाजे, खिडक्या संबधित पॉलिमर आधारित प्रोफाइल तयार करण्याचे काम करते. कंपनीच्या उत्पादन श्रेणीमध्ये PVC प्रोफाइल, UPVC दरवाजा आणि खिडकी प्रोफाइल, WPC प्रोफाइल आणि विविध आयाम, वैशिष्ट्ये आणि रंगांसह 1200 पेक्षा अधिक SKU सामील करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त कंपनी कारखान्यात तयार केलेले पीव्हीसी दरवाजे बनवण्याचे काम देखील करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.