
Kamdhenu Ventures Share Price | कामधेनू व्हेंचर्स कंपनीने नुकताच आपल्या शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. महिला 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 155 टक्के नफा कमावून दिला आहे. आता कामधेनू व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे. मॉरिशसस्थित परकीय संस्थात्मक गुंतवणूकदाराने कामधेनू व्हेंचर्स कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी कामधेनू व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स 1.13 टक्के वाढीसह 196.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
FII ने खरेदी केले 3.5 लाख शेअर्स :
नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर उपलब्ध डेटानुसार, परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारने कामधेनू व्हेंचर्स कंपनी 3.50 लाख शेअर्स 196 रुपये किमतीवर खरेदी केले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणाऱ्या परकीय संस्थात्मक गुंतवणूकदाराचे नाव आहे, सेंट कॅपिटल फंड. मॉरिशसस्थित या परकीय संस्थागत गुंतवणूकदार सेंट कॅपिटल फंडाने कामधेनू व्हेंचर्स कंपनीमध्ये तब्बल 6.86 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे.
6 महिन्यांत 155 टक्के परतावा :
कामधेनू व्हेंचर्स कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 155 टक्के परतावा कमावून दिला आहे. 6 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 77.28 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 4 ऑगस्ट 2023 रोजी कंपनीचे शेअर्स 196.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 78 टक्के परतावा कमावून दिला आहे. कामधेनू व्हेंचर्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 203 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 65.50 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.