
Karur Vysya Bank Share Price | करूर व्यस्या बँकेचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मजबूत तेजीत वाढत होते. आज मात्र या खाजगी बँकेचे शेअर्स विक्रीच्या दबावात क्लोज झाले आहेत. शुक्रवारी या बँकेचे शेअर्स 1.50 टक्के वाढीसह 188.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ब्रोकरेज फर्म या बँकेच्या शेअर्सबाबत सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. आज मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी करूर व्यस्या बँकेचे शेअर्स 0.41 टक्के घसरणीसह 182.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजच्या तज्ञांच्या मते, करूर व्यस्या बँकेचे शेअर्स पुढील काळात 200 रुपये किंमत पार करू शकतात. त्यामुळे तज्ञांनी या स्टॉकवर 210 रुपये टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. मात्र तज्ञांनी गुंतवणूक करताना या स्टॉकमध्ये 165 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. अशा परिस्थितीत करूर व्यस्या बँकेचे शेअर्स गुंतवणुकदारांना 18 टक्के नफा कमावून देऊ शकतात.
2 फेब्रुवारी 2024 रोजी करूर व्यस्या बँकेचे शेअर्स 204.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मार्च 2023 मध्ये या बँकेच्या शेअरची किंमत 92.80 रुपये किमतीवर आली होती. करूर व्यस्या बँकेच्या प्रवर्तकानी बँकेचे एकूण 2.28 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणुकदारांनी या बँकेचे 97.72 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. बँकेच्या प्रवर्तक गटात एकूण 34 व्यक्ती सामील आहेत.
नुकताच या बँकेने आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत करूर व्यस्या बँकेने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 43 टक्के अधिक निव्वळ माफ कमावला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत बँकेने 289 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर या तिमाहीत बँकेने 412 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. या बँकेचे महसूल उत्पन्न 24 टक्क्यांच्या वाढीसह 2,497 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.
मागील वर्षीच्या याच तिमाहीत करूर व्यस्या बँकेने 2,013 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. करूर व्यस्या बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 12.6 टक्क्यांच्या वाढीसह 1,001 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 889 कोटी रुपये नोंदवले गेले होते. या बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन 4.32 टक्के आहे. हेच प्रमाण मागील वर्षीच्या याच तिमाहीत 4.36 टक्के होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.