
Karur Vysya Bank Share Price | करूर व्यास्या बँकचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 12 टक्के वाढीसह 188.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा बँकिंग स्टॉक किंचित वाढीसह ट्रेड करत आहे. या बँकेच्या शेअर्समध्ये ही तेजी डिसेंबर 2023 च्या तिमाही निकालामुळे पाहायला मिळत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत करूर व्यास्या बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेने 42.56 टक्के वाढीसह 412 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
सोमवारी या बँकेने एक निवेदनात जाहीर करून माहिती दिली की, मागील वर्षी याच तिमाहीमध्ये करूर व्यास्या बँकेने 289 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आज बुधवार दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी करूर व्यास्या बँकचे शेअर्स 0.38% घसरून 181.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात डिसेंबर 2023 तिमाहीपर्यंत करूर व्यास्या बँकेचा एकूण निव्वळ नफा 49.61 टक्के वाढीसह 1,149 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील मागील वर्षीच्या याच तिमाही काळात करूर व्यास्या बँकने 768 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षीच्या डिसेंबर तिमाहीत करूर व्यास्या बँकने 2,012.71 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर डिसेंबर 2023 तिमाहीत या बँकेचा महसूल संकलन वाढून 2,497.17 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.
31 डिसेंबर 2023 पर्यंत करूर व्यास्या बँकचे ग्रॉस नॉन-परफॉर्मिंग अॅसेट 1.12 टक्क्यांच्या वाढीसह एकूण कर्जाच्या 1.58 टक्के नोंदवले गेले आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत बँकेचा GNPA 2.70 टक्के नोंदवला गेला होता. डिसेंबर 2023 ला संपलेल्या तिमाहीत करूर व्यास्या बँकचा एकूण NPA 1,152 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर 31 डिसेंबर 2022 रोजी या बँकेचा NPA 1,674 कोटी होता. डिसेंबर 2023 तिमाहीत बँकेचा NPA निव्वळ ऍडव्हान्सच्या 0.42 टक्के म्हणजे जवळपास 305 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. हेच प्रमाण 31 डिसेंबर 2022 रोजी 0.90 टक्के म्हणजेच 550 कोटी रुपये होते.
मागील एका महिन्यात करूर व्यास्या बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 13.73 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या बँकेचे शेअर्स एकूण 43.80 टक्के मजबूत झाले आहेत. मागील एका वर्षात करूर व्यास्या बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 71.43 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत करूर व्यास्या बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 102 टक्के परतावा कमावून दिला आहे. या बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 92.80 रुपये होती. करूर व्यास्या बँकेचे एकूण बाजार भांडवल 14,862,56 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.