27 April 2024 12:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र गुंतवणूकदारांची चांदी, लाभांश जाहीर, शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Post Office Interest Rate | महिलांच्या प्रचंड फायद्याची खास योजना, बचतीवर मिळेल मोठा व्याज दर, परतावा रक्कम? Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले?
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्सबाबत मोठी अपडेट, तज्ज्ञांनी नवीन टार्गेट प्राइस जाहीर केली, फायदा होणार?

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील हा स्टॉक तेजीत वाढत होता. सध्या टाटा समूहाचा भाग असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 135.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसाअखेर या कंपनीचे शेअर्स 135 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांच्या मते, हा स्टॉक आणखी वाढू शकतो. आज मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 1.26 टक्के वाढीसह 136.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलच्या तज्ञांनी टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस 145 रुपये निश्चित केली आहे. याआधी तज्ञांनी टाटा स्टील स्टॉकवर 150 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली होती. ब्रोकरेजने आता ही टार्गेट प्राइस 3 टक्क्यांनी कमी केली आहे. जानेवारी 2024 च्या सुरुवातीला टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 142.15 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 101.65 रुपये होती.

सेंट्रम ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 128 रुपये किमतीवर येऊ शकतात. ब्रोकरेज फर्मच्या मते, टाटा स्टील कंपनीची स्थिती सुधारली आहे. या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ कर्जात किरकोळ वाढ पाहायला मिळाली आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स किंचित घसरण्याची शक्यता आहे. नुकताच टाटा स्टील कंपनीने आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते.

आर्थिक वर्ष 2023-24 च्या डिसेंबर तिमाहीत टाटा स्टील कंपनीने 522 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच डिसेंबर तिमाहीत टाटा स्टील कंपनीने 2224 कोटी रुपये तोटा नोंदवला होता. डिसेंबर 2023 तिमाहीत टाटा स्टील कंपनीने 57,083 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. टाटा स्टील कंपनीचा EBITDA 4048 कोटी रुपयेवरून वाढून 6,263.6 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर कंपनीचा EBITDA मार्जिन 7.1 टक्के वरून वाढून 11.3 टक्के नोंदवला गेला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price NSE Live 30 January 2024.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x