
Kaya Share Price | काया लिमिटेड या वेलनेस कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत धावत आहेत. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 16 टक्केपेक्षा जास्त वाढीसह 454 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर 10 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 395.90 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. ( काया लिमिटेड कंपनी अंश )
मागील 3 दिवसात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 69 टक्के वाढली आहे. शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी काया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 12.89 टक्के वाढीसह 441 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
11 जून 2024 रोजी काया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 267.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. काया लिमिटेड कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 69 टक्के वाढले आहे. मागील 5 दिवसात काया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 58 टक्के परतावा कमावून दिला आहे. 10 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 287 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर 14 जून 2024 ला हा स्टॉक 454 रुपये किमतीवर पोहचला होता.
14 जून 2023 रोजी काया लिमिटेड या वेलनेस कंपनीचे शेअर्स 338.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे. 14 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 322.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 23 टक्के घसरली आहे. काया लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 580 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.