12 May 2024 10:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल SBI Mutual Fund | कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य बदलेल ही SBI फंडाची खास योजना, अल्पावधीत 30 लाख रुपये मिळतील Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या Tata Altroz | टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध हॅचबॅक कार वर बंपर डिस्काउंट, शो-रुमध्ये ऑफर येताच बुकिंगला गर्दी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा
x

Post Office Scheme | तुम्ही या योजनेत गुंतवणूक करून वार्षिक 29,700 रुपये परतावा मिळवू शकता, योजनेबद्दल जाणून घ्या

Post Office scheme

Post Office scheme | आजकाल सुरक्षित परतावा देणारी गुंतवणूक शोधणे फार कठीण नाही, त्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये जा आणि तुम्हाला तिकडे एक से बढकर एक अश्या गुंतवणूक योजना दिल्या जातील. पोस्ट ऑफीस मधे गुंतवणूक करणे हा एक सोपा पर्याय आहे. येथे तुमचे पैसे सुरक्षित राहतील, यासोबतच तुम्हाला जबरदस्त परतावा सुद्धा मिळेल. तुम्ही पोस्ट ऑफिसच्या एखाद्या चांगल्या योजनेमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही या लेखात एक जबरदस्त योजनेची माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊ

आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा एका जबरदस्त योजने माहिती देणार आहोत, की ज्याद्वारे तुम्ही दरमहा भरघोस फायदा मिळवू शकता. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही वार्षिक 29,700 रुपये परतावा मिळवू शकता. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना असे या योजनेचे नाव आहे. तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी एकरकमी पैसे टाकावे क लागतील म्हणजेच तुम्हाला MIS खात्यात एकदाच एक चांगली रक्कम गुंतवणूक करावी लागेल आणि त्यानंतर तुम्ही दरमहा त्यातून मिळणाऱ्या परताव्यातून भरघोस कमाई करू शकता.

पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही योजनेवर बाजारातील चढउतारांचा, पडझडीचा किंवा नकारात्मक बातमीचा कोणताही परिणाम होत नाही. या योजनेत गुंतवणूक करताना तुम्हाला 1000 रुपयेच्या पटीत पैसे जमा करावे लागतील. या योजनेचा परिपक्वता कालावधी 5 वर्ष आहे. पोस्ट ऑफिस MIS वर सध्या 6.6 टक्के वार्षिक व्याज परतावा दिला जातो. यामध्ये तुम्ही एकरकमी 4.5 लाख गुंतवणूक केल्यास, मुदत पूर्तीनंतर तुम्हाला पुढील 5 वर्षांत 29,700 रुपये वार्षिक व्याज उत्पन्न मिळेल. म्हणजेच तुम्हाला प्रत्येक महिन्याला 2475 रुपये गुंतवणुकीरील परतावा म्हणून मिळतील.

आवश्यक कागदपत्र :
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्र लागतील. आधार कार्ड, पासपोर्ट, मतदार कार्ड किंवा वाहन चालविण्याचा परवाना ओळखपत्र म्हणून जमा करावे लागेल. यासोबतच तुम्हाला 2 पासपोर्ट आकाराचे फोटोही अर्जासोबत जोडावे लागतील. याशिवाय, सरकारने जारी केलेले ओळखपत्र किंवा युटिलिटी बिल किंवा राहण्याचा पत्त्यासंबंधित कागदपत्र रहिवाशी पुराव्यासाठी वैध असेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Post Office scheme for investment and benefits purpose on 30 August 2022.

हॅशटॅग्स

Post office Scheme(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x