28 April 2024 5:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

Kirloskar Oil Engines Share Price | धोके तिथे खोके! या शेअरने 5 दिवसात 28% परतावा दिला, स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, खरेदी करावा?

Kirloskar Oil Engines Share Price

Kirloskar Oil Engines Share Price | मागील पाच दिवसापासून ‘किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवार दिनांक 9 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.49 टक्के वाढीसह 395.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बॉम्बे किर्लोस्कर ऑइल इंजिन कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 391.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 406.20 रुपये आहे. तर नीचांक किंमत पातळी 124.05 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Kirloskar Oil Engines Share Price | Kirloskar Oil Engines Stock Price | BSE 533293 | NSE KIRLOSENG)

कुलकर्णी कुटुंबाची एक्झिट :
‘किर्लोस्कर ऑइल इंजिन्स’ कंपनीच्या शेअर्सने आज आपला 5 वर्षांचा उच्चांक गाठला आहे. कंपनीचे शेअर्स फेब्रुवारी 2018 पासून सर्वोच्च पातळीवर राहिले आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये पहिल्या सत्रात ब्लॉक डील झाली. कुलकर्णी कुटुंबाने कंपनीतील भाग भांडवल विकले असावे असा अंदाज तज्ञांनी लावला आहे. त्याचबरोबर देशांतर्गत विमा कंपन्या आणि म्युच्युअल फंडांनी या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहेत. किर्लोस्कर उद्योग समूह तेल, इंजिन, शेती उपकरणे आणि जनरेटर संच तयार करण्याच्या व्यवसायात गुंतलेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही कंपनीने आपला व्यवसाय केला आहे. कंपनी बांधकाम उपकरणांसाठी डिझेल इंजिन तयार करण्याचे काम करते.

1 वर्षात दिला 200 टक्के परतावा :
31 डिसेंबर 2022 पर्यंतच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार ‘किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड’ कंपनीमधील प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाकडे 59.42 टक्के भाग भांडवल आहे. ‘किर्लोस्कर ऑइल इंजिन’ कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना जवळपास 201 टक्के परतावा कमावून दिला आहे. 9 मार्च 2022 रोजी बीएसई इंडेक्सवर ‘किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 130 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. किर्लोस्कर ऑइल इंजिन कंपनीचे शेअर्स 9 मार्च 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर 395.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kirloskar Oil Engines Share Price 533293 KIRLOSENG on 09 March 2023.

हॅशटॅग्स

Kirloskar Oil Engines Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x