
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो या बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीचा शेअर सलग तिसऱ्या सत्रात घसरून 3,863.20 रुपयांवर आला आहे. गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी लार्सन अँड टुब्रो शेअर 1.37 टक्के घसरून 3,863.20 रुपयांवर पोहोचला होता. मॅक्वेरी ब्रोकरेज फर्मने लार्सन अँड टुब्रो कंपनी शेअरसाठी ४,२१० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. लार्सन अँड टुब्रो शेअरसाठी मॅक्वेरी ब्रोकरेज फर्मने ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग जाहीर केली आहे.
लार्सन अँड टुब्रो शेअरची सध्याची स्थिती
गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी एल अँड टी 1.37 टक्के घसरून 3,863.20 रुपयांवर पोहोचला होता. लार्सन अँड टुब्रो शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक स्तर 3,963.50 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 3,175.05 रुपये होता. सध्या लार्सन अँड टुब्रो कंपनीचे एकूण मार्केट कॅप 5,30,888 कोटी रुपये आहे.
स्टॉक मार्केट तज्ज्ञ नुरेश मेराणी – लार्सन अँड टुब्रो शेअर टार्गेट प्राईस
स्टॉक मार्केट टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट नुरेश मेराणी यांनी लार्सन अँड टुब्रो कंपनी शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. नुरेश मेराणी यांनी लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी 4,200 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच नुरेश मेराणी यांनी लार्सन अँड टुब्रो खरेदी करताना 3,780 रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील नुरेश मेराणी यांनी दिला आहे.
लार्सन अँड टुब्रो शेअरने 21,103% परतावा दिला
मागील ५ दिवसात लार्सन अँड टुब्रो शेअर 1.55% घसरला आहे. मागील १ महिन्यात लार्सन अँड टुब्रो शेअरने 7.57% परतावा दिला आहे. मागील सहा महिन्यात या शेअरने 6.42% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात लार्सन अँड टुब्रो शेअरने 15.58% परतावा दिला आहे.
YTD आधारावर लार्सन अँड टुब्रो शेअरने 9.58% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 195.96% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये लार्सन अँड टुब्रो शेअरने गुंतवणूकदारांना 21,103.07% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.