2 May 2025 4:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC
x

LIC Share Price | एलआयसी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, किती परतावा मिळणार?

LIC Share Price

LIC Share Price | एलआयसी या भारतातील सर्वात मोठ्या सरकारी विमा कंपनीच्या शेअर्समधे जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून देत आहेत. ब्रोकरेज फर्म जिओजितने दीर्घ काळासाठी एलआयसी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

तज्ञांच्या मते, नवीन विमा योजना लॉन्च केल्याने एलआयसी कंपनीच्या वाढीला गती मिळू शकते. एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी विमा आणि गुंतवणूक कंपनी मानली जाते. मागील एका महिन्यापासून एलआयसी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त रिकव्हरी पाहायला मिळत आहे.

मागील एका महिन्यात एलआयसी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 14 टक्के परतावा कमावून दिला आहे. तज्ञांच्या मते पुढील 12 महिन्यांत LIC स्टॉक 21-22 टक्के परतावा देऊ शकतो. आज शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी एलआयसी स्टॉक 1.47 टक्के घसरणीसह 669.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

जिओजित फर्मने एलआयसी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी शेअरची लक्ष्य किंमत 823 रुपये निश्चित केली आहे. 29 नोव्हेंबर 2023 रोजी एलआयसी कंपनीचे शेअर्स 680 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. एलआयसी कंपनीने बुधवारी जीवन उत्सव योजना लाँच केली होती. एलआयसी कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले होते की, जीवन उत्सव योजना ही ‘नॉन-लिंक्ड’, नॉन-पार्टिसिपेट, वैयक्तिक बचत, संपूर्ण जीवन विमा योजना आहे.

ब्रोकरेज हाऊसच्या मते, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन कंपनीने नवीन योजना लॉन्च केल्याने कंपनीच्या व्यवसाय वाढीला चालना मिळू शकते. एलआयसी कंपनीमध्ये भारत सरकारने मॅच्युरिटी स्टेक धारण केले आहे. एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी आघाडीची विमा आणि गुंतवणूक कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीची व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता 47 लाख कोटी रुपये आहे. यासह एलआयसी कंपनीने भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या 270 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.

तज्ञांच्या मते, एलआयसी कंपनीच्या सिंगल प्रीमियममध्ये घट झाल्यामुळे, कंपनीचे एकूण प्रीमियम उत्पन्न 18.7 टक्केने कमी झाले आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीचे प्रीमियम उत्पन्न 107,947 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. चालू आर्थिक वर्षात एलआयसी कंपनीच्या नवीन व्यवसायाचे मूल्य 10 टक्के वाढले आहे. कंपनीचा VNB मार्जिन 14.6 टक्के स्थिर आहे. नवीन विमा योजना कंपनीच्या व्यवसाय धोरणास अधिक मजबूत करेल. आणि याशिवाय, कंपनीचे विस्तृत वितरण नेटवर्क आणि डायनॅमिक डिजिटायझेशन मोड भविष्यात कंपनीच्या व्यवसाय वाढीला अधिक चालना देईल. तज्ञांनी एलआयसी कंपनीच्या स्टॉकवर 823 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC Share Price NSE 01 December 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(104)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या