3 February 2023 6:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sterling Tools Share Price | मल्टीबॅगर शेअर, 9 महिन्यांत 200% परतावा, शेअर खरेदी करावा का? Sunteck Realty Share Price | लॉटरी शेअर! फक्त 59 हजाराच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा दिला, आता अजून 70% मिळेल Numerology Horoscope | 04 फेब्रुवारी, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल? तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Income Tax Slab 2023 | वार्षिक पगार 12 लाख रुपये आहे का? नव्या इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये 5 पट टॅक्स भरावा लागणार Star Health & Allied Insurance Share Price | 4 दिवसात 15% परतावा, झुनझुनवालांचा फेव्हरेट शेअर खरेदीचा तज्ञांचा सल्ला, कारण? Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जबरदस्त कोसळले, खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील आजचे नवे दर पहा RACL Geartech Share Price | जबरदस्त शेअर! 1051 टक्के परतावा देणारा शेअर ऑल टाईम फेव्हरेट, कारण काय?
x

Sarkari Stocks | काय भाऊ! तुम्ही या सरकार बँकांच्या FD मध्ये 5-6% व्याज घेताय, शेअर घ्या ना यांचे, 55-90 टक्के परतावा मिळेल

Sarkari Shares

Sarkari Stocks | काल शेअर बाजारात कमालीची पडझड पाहायला मिळाली होती, आणि दुपारी 2.31 वाजेपर्यंत सेन्सेक्स निर्देशांक 575.44 अंकांच्या घसरणीसह 61,088.04 अंकांवर ट्रेड करत होता. या जबरदस्त घसरणीनंतर सार्वजनिक क्षेत्रातील पाच बँकांचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या सरकारी बँकांचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉक बद्दल सविस्तर माहिती.

1) सेंट्रल बँक ऑफ इंडिया :
सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे शेअर्स आज 26.45 रुपये वाढीसह आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मे 2022 पासून या बँकेचे शेअर सातत्याने वरच्या दिशेने वाढता आहेत. मागील 6 महिन्यांत या बँकेच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 46 टक्क्यांहून जास्त परतावा कमावून दिला आहे. या बँकेच्या शेअर्सने या वर्षी आतापर्यंत 19 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या स्टॉकमधे 26.17 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

2) इंडियन बँक :
सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या बँकेचे शेअर्सनी आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. मागील आठवड्यात सतत तीन दिवस हा स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होता. मागील सहा महिन्यांत या बँकेचे शेअर्स 156.70 रुपयेवरून 275 रुपये वर पोहोचले आहेत. या कालावधीत बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 72 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. 2022 मध्ये आतापर्यंत या बँकिंग स्टॉकची किंमत 90 टक्क्यांहून अधिक वाढली आहे.

3) पंजाब नॅशनल बँक :
पीएनबी बँकेच्या शेअर्स नी मागील काही काळात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. पीएनबी बँकेच्या शेअरची किंमत सलग दोन ट्रेडिंग सेशनमध्ये 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होती. आज हा स्टॉक 47.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांचा नवीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचला आहे. मे 2022 पासून PNB बँक हा PSU बँकिंग स्टॉक अप ट्रेंडमध्ये आहे. 2022 मध्ये आतापर्यंत शेअरची किंमत जवळपास 25 टक्के वाढली आहे. सहा महिन्यांपूर्वी हा स्टॉक 30.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, तो आता 47.80 रूजये पोहोचला आहे. या कालावधीत शेअरची किंमत 55 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षभरात PNB बँकेच्या शेअरनी आपल्या गुंतवणूकदारांना 19 टक्के परतावा कमावून दिला आहे.

4) UCO बैंक :
अल्पावधीत या बँकिंग स्टॉकच्या शेअरमध्ये 17 टक्क्यांहून अधिक वाढ पहायला मिळाली आहे. सध्या युको बँकेचे शेअर्स 18.90 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. 2022 या चालू वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत युको बँकेच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी आली आणि स्टॉक धावत सुटले. मागील एका महिन्यात या बँकेच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 47 टक्क्यांहून अधिक नफा कमवून दिला होता. मागील सहा महिन्यांत युको बँकेच्या शेअर्सनी 60 टक्क्यांहून अधिक वाढ प्राप्त केली आहे.

5) युनियन बैंक ऑफ इंडिया :
युनियन बँक ऑफ इंडियाचे शेअर्स आज हिरव्या निशाणी वर ट्रेड करत होते. शेअर 75.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर व्यवहार करत होते. मे 2022 पासून या शेअरमध्ये अप ट्रेंड सुरू झाला आहे. मागील सहा महिन्यांत UBI च्या शेअरनी आपल्या शेअर धारकांचे पैसे दुप्पट प्रमाणात वाढवले आहे. या कालावधीत शेअरच्या किमतीत 108 टक्क्यांपर्यंत वाढ पाहायला मिळाली आहे. हा बँकिंग स्टॉक 2022 मध्ये मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या स्टॉकच्या यादीत समाविष्ट आहे. हा PSU स्टॉक मागील एका महिन्यात 55 टक्क्यांहून जास्त वधारला असून त्यात प्रॉफिट बुक करण्याची वेळ आली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| List of 5 Sarkari Shares Top Public sector bank shares Trading on 52 week high price on 23 November 2022.

हॅशटॅग्स

#Sarkari Shares(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x