 
						Loan Transfer | भारतीय रिझर्व बॅंक सातत्याने रेपो दरात वाढ करत आहे. नुकताच रेपो दरात ५० बेसीस पॉइंटची वाढ झाली. त्याने व्याज दर ५.९ टक्कांवर गेला. असे झाल्याने सर्वच बॅंकांनी आपले व्याज दर वाढवले. यात सर्वसामान्यांना त्यांचा ईएमआय आता डोईजड झाला आहे. तसेच काही बॅंका कर्ज देताना त्यांचे छूपे दर सांगत नाहीत. व्याज घेतल्यावर या सर्व गोष्टी समोर आणल्या जातात. यात मोठे नुकसाण होते. जर तुम्ही देखील आधीच कर्जबाजारी आहात आणि बॅंक तुमच्यावर आणखीन छुपे दर लादत असेल तर तुम्ही तुमचे कर्ज दुसरीकडे ट्रांसफर करु शकता.
ही अगगी सहज सोपी प्रोसेस आहे. अनेकदा कर्ज घेतल्यावर दुस-या बॅंकेत कमी व्याज दराने कर्ज आहे असे समजते. त्यामुळे आपण तर फसलो असे अनेकांना वाटते. मात्र तसे नसते. तुम्ही तुमचे कर्ज तुम्हाला हवे असलेल्या बॅंकेत वळवून घेऊ शकता. यासाठी काय केले पाहीजे हेच या बातमीतून जाणून घेऊ.
कर्ज दुस-या बॅंकेत ट्रांसफर करण्याआधी त्या बॅंकेची निट चौकशी करा. तिथे खरोखर सध्याच्या तुलनेत व्याज दर कमी आहे का. ती बॅंक व्याज दर कमी करून दुस-या मार्गाने वेगळे चार्जेस आकारते का? याची निट चौकशी करा. त्यानंतरच कर्ज ट्रांसफर करण्याचा निर्णय घ्या.
यासाठी तुम्हाला तुमच्या आधीच्या बॅंकेकडून नविन बॅंकेला फोरक्लोजरसाठी अर्ज द्यावा लागतो. तसेच मालमत्तेची सर्व कागदपत्रे आणि खात्याचे तपशील द्यावे लागतात. ही सर्व माहिती आणि कागदपत्रे तुमच्या नव्या म्हणजेच जेथे कर्ज ट्रांसफर करायचे आहे तेथे द्यावे लागतात.
* यात महत्वाचे म्हाणजे कर्ज ट्रांसफर करताना नविन बॅंकेत जुन्या बॅंकेतून मिळालेले नाहरकत प्रमाणपत्र सादर करावे लागते.
* नविन बॅंकेत तुम्हाला 1 टक्के प्रक्रिया शुल्क भरावे लागते. हे शुल्क लोन ट्रांसफर करण्याचा प्रक्रीयेसाठी असते.
* तसेत यात तुम्हाला केवायसी, मालमत्ता पेपर, कर्जाची शिल्लक रक्कम, अर्ज, सहमतीपत्र ही कागदपत्रे एकाचवेळी द्यावी लागतात.
* सर्व प्रक्रिया झाल्यावर संमत्ती पत्र बॅंक मिळते. असे केल्यावर तुमचे जुन्या बॅंकेतील कर्ज बंद होतो. नविन बॅंकेत सर्व शुल्क भरल्यावर तुमचा ईएमआय सुरू होतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		