
Lokesh Machines Share Price | शेअर बाजारात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अनेक शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. यापैकीच एक स्टॉक होता, लोकेश मशिन्स कंपनीचा. लहान शस्त्रास्त्रे बनवणाऱ्या लोकेश मशिन्स कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते. स्टॉक कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्क्यांच्या वाढीसह 185.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. आज शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 12.45 टक्के वाढीसह 209.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
लोकेश मशिन्स स्टॉक वाढीचे कारण
लोकेश मशिन्स कंपनीच्या शेअरमध्ये अचानक तेजी येण्याचे कारण म्हणजे, कंपनीशी संबंधित एक सकारात्मक बातमी आली आहे. लोकेश मशिन्स कंपनीला लहान शस्त्रे बनवण्याचा परवाना देण्यात आला आहे. छोट्या शस्त्रास्त्रांच्या निर्मितीसाठी कंपनीने प्रारंभिक परवानासाठी अर्ज केला होता, तो मंजूर झाला आहे.
लोकेश मशीन्स कंपनीने यासंबंधी माहिती स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये नमूद केली आहे. मात्र अद्याप कंपनीला लायसन्सची प्रत मिळालेली नाही. प्रत मिळाल्याबरोबर आम्ही ताबडतोब स्टॉक एक्सचेंजला कळवू, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
लोकेश मशिन्स शेअरची कामगिरी
लोकेश मशिन्स कंपनीच्या शेअर्सनी चालू कॅलेंडर वर्ष 2023 मध्ये S & P DSC मधील 3.4 टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत 75 टक्के वाढ नोंदवली आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 96.32 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन महिने किंवा एक महिन्याच्या कालावधीत लोकांनी या स्टॉकमधून 65 टक्के परतावा कमावला आहे. एप्रिल 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स 15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर या स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 64.30 रुपये होती.
लोकेश मशिन्स कंपनीबद्दल थोडक्यात
लोकेश मशिन्स कंपनीचे सहा उत्पादन युनिट सध्या काम करत आहेत. यातील पाच युनिट हैदराबाद आणि एक पुण्यात चालू आहे. या कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये मुख्यतः मशीन टूल्स, CNC लेथ, व्हर्टिकल मशीनिंग सेंटर, हॉरिझॉन्टल मशीनिंग सेंटर, व्हर्टिकल टर्निंग सेंटर, स्पेशल पर्पज मिलिंग मशीन, लाइन बोरिंग मशीन, आणि गन ड्रिलिंग मशीन यासारखे उत्पादन सामील आहेत. 31 मार्च 2023 पर्यंत लोकेश मशिन्स कंपनीच्या एकूण ऑर्डर बुकचे मूल्य 216.82 कोटी रुपये नोंदवले गेले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.