
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो या भारतातील दिग्गज कंपनीला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएकडून 7,000 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. मुंबई ऑरेंज गेट आणि ईस्टर्न फ्रीवे दरम्यान कोस्टल रोड ब्रिजच्या बांधकामात भूमिगत बोगद्याची रचना करण्याचे काम देण्यात आले आहे. L & T Share Price
लार्सन अँड टुब्रो कंपनीला हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 54 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. आज शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी लार्सन अँड टुब्रो स्टॉक 0.53 टक्के वाढीसह 3,026.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
कंपनीचे स्पष्टीकरण :
लार्सन अँड टुब्रो कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, लार्सन अँड टुब्रो कंपनीला नवीन ऑर्डर अंतर्गत टनल बोरिंग मशीन्सचा वापर करून दुहेरी रस्त्याच्या बोगद्यांचे डिझाईन आणि बांधकाम करण्याचे काम देण्यात आले आहेत. हे बोगदे मुंबईतील दक्षिणी टर्मिनलजवळील ऑरेंज गेट येथील सध्याच्या ट्रान्झिशन रॅम्पद्वारे बांधले जाणार आहे.
हे दोन्ही रस्ते एलिव्हेटेड ईस्टर्न फ्रीवे आणि मरीन ड्राईव्हशी डायरेक्ट जोडले जाणार आहेत. यापूर्वी देखील लार्सन अँड टुब्रो कंपनीला मोठ्या ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला देखील लार्सन अँड टुब्रो कंपनीला अरामको कंपनीने एक मोठी ऑर्डर दिली होती. ही ऑर्डर सौदी अरामको कंपनीच्या जाफुराह अपारंपरिक गॅस विकास प्रकल्पाचे काम करण्यासाठी देण्यात आली आहे. या ऑर्डरचे एकूण मुल्य 2.9 अब्ज डॉलर्स म्हणजे भारतीय चलनात जवळपास 24,000 कोटी रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.