
Mankind Pharma Share Price | मॅनकाइंड फार्मा लिमिटेड कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 1913.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मॅनकाइंड फार्मा कंपनीचा IPO चार महिन्यांपूर्वी 1080 रुपये या इश्यू किंमतींवर शेअर बाजारात लॉन्च करण्यात आला होता. आता हा स्टॉक आपल्या IPO किमतीच्या तुलनेत 77.14 टक्के मजबूत झाला आहे.
जून 2023 तिमाहीत मॅनकाइंड फार्मा कंपनीने आपल्या निव्वळ नफ्यात 66 टक्के वाढ नोंदवली आहे. आज शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी मॅनकाइंड फार्मा कंपनीचे शेअर्स 0.47 टक्के वाढीसह 1,907.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जून 2023 तिमाहीत मॅनकाइंड फार्मा कंपनीने 494 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षीच्या जून 2022 तिमाहीत मॅनकाइंड फार्मा कंपनीने 298 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर FY24 च्या जून तिमाहीत कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत 18 टक्के वाढीसह 2579 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जून 2023 तिमाहीत कंपनीचा EBITDA 43 टक्के वाढीसह 660 कोटी रुपये नोंदवला आहे. जून तिमाहीत मॅनकाइंड फार्मा कंपनीने 66 टक्के वाढीसह 494 कोटी रुपये PAT नोंदवला आहे.
मॅनकाइंड फार्मा कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या जून 2023 तिमाहीत आपली निव्वळ रोखमध्ये 1,727 कोटी रुपये पर्यंत वाढ नोंदवली आहे. मॅनकाइंड फार्मा कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 9.22 टक्के परतावा कमावून दिला आहे. मॅनकाइंड फार्मा कंपनीचे एकूण बाजार भांडवल 73,057 कोटी रुपये आहे. IPO सूचीबद्ध झाल्यानंतर प्रथमच या फार्मा कंपनीने आपले तिमाही आर्थिक निकाल जाहीर केले आहेत.
जून 2023 तिमाहीमध्ये या कंपनीने जबरदस्त कामगिरी केली आहे. मॅनकाइंड फार्मा कंपनीच्या अध्यक्षांनी आर्थिक निकाल जाहीर करताना माहिती दिली की, “मॅनकाइंड फार्मा कंपनीने सेल्स आणि निव्वळ नफ्यात दोन अंकी वाढ साध्य करून 2023-24 या आर्थिक वर्षाची सुरुवात केली आहे”.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.