
Minaxi Textiles Share Price | मिनाक्षी टेक्सटाइल कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या पेनी स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. अशीच तेजी आज देखील पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मिनाक्षी टेक्सटाइल कंपनीचे शेअर्स 15 टक्क्यांच्या वाढीसह 2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
आज शुक्रवार दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी मिनाक्षी टेक्सटाइल कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 2.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 9 जानेवारी 2024 रोजी मिनाक्षी टेक्सटाइल कंपनीचे शेअर्स 2.21 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्याच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले आहेत. 10 जुलै 2023 रोजी मिनाक्षी टेक्सटाइल कंपनीचे शेअर्स 1.21 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किमतीवर ट्रेड करत होते.
सप्टेंबर 2023 तिमाहीत मिनाक्षी टेक्सटाइल कंपनीच्या प्रवर्तकांनी या कंपनीचे 37.98 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 62.02 टक्के भाग भांडवल धारण केले होते. सध्या या कंपनीच्या वैयक्तिक प्रवर्तक गटात 3 लोक आहेत. त्यांनी कंपनीचे एकूण 1,87,68,547 शेअर्स होल्ड केले आहेत. कंपनीच्या प्रवर्तक गटतील दिनेश कुमार आणि कृती कुमार पटेल यांनी कंपनीचे 89,60,454 शेअर्स होल्ड केले आहेत.
मिनाक्षी टेक्सटाइल कंपनीच्या शेअर्सने मागील सहा महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे. मात्र मागील एका वर्षाचा आणि दोन वर्षाचा परतावा नकारात्मक राहिला आहे. तर तीन वर्षांच्या कालावधीमध्ये या कंपनीच्या शेअर्सने लोकांना 230 टक्के सकारात्मक परतावा कमावून दिला आहे. मिनाक्षी टेक्सटाइल लिमिटेड कंपनीची स्थापना 1995 साली झाली होती. ही कंपनी मुख्यतः सूटिंग आणि शर्टिंगच्या सिंथेटिक ग्रे फॅब्रिकच्या विणकामाचा व्यवसाय करते. ही कंपनी मुख्यतः सरकारी आणि विभागांना गणवेश पुरवठा करण्याचा व्यवसाय करते.
मिनाक्षी टेक्सटाइल कंपनीने आदित्य बिर्ला ग्रुपसोबत तागाचे विणकाम करण्यासाठी 30 वर्षांचा व्यावसायिक करार केला आहे. मिनाक्सी टेक्सटाइल्सने भारतातील प्रमुख शहरांमध्ये कापडाची स्थानिक बाजारपेठ काबीज केली आहे. या कंपनीचे संस्थापक कनुभाई पटेल 2006-07 पर्यंत कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करत होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.