Money From IPO | हा शेअर लिस्ट होण्यापूर्वीच GMP 50 रू प्रीमियमवर, हा IPO ठरणार मोठ्या नफ्याचा?

Money From IPO | बुधवार दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी धर्मराज क्रॉप गार्ड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला आहे. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 52.29 पट अधिक सबस्क्राईब झा. पात्र संस्थात्मक खरेदीदार म्हणजेच QIBs साठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 48.21 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. तर किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 21.53 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.
सोमवार दिनांक 5 डिसेंबर 2022 रोजी धर्मराज क्रॉप कंपनीचे शेअर्स पात्र गुंतवणुकदारांना वाटप केले जातील. बुधवार दिनांक 7 डिसेंबर 2022 रोजी धर्मराज क्रॉप कंपनीचे IPO शेअर्स पात्र गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात शेअर्सचे क्रेडिट केले जातील. लिंकइन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला धर्मराज क्रॉप कंपनीच्या IPO साठी रजिस्ट्रार म्हणून नियुक्त केले आहे. IPO मध्ये ज्या लोकांना शेअर्स वाटप करण्यात येतील, त्याचे स्टेटस रजिस्ट्रारच्या वेबसाइटवर किंवा BSE च्या अधिकृत वेबसाइटवर चेक करता येईल.
ग्रे मार्केटमध्ये शेअरची वाटचाल :
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते धर्मराज क्रॉप गार्ड कंपनीचे शेअर्स सध्या ग्रे मार्केटमध्ये 50 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे शेअर्स गुरुवार दिनांक 8 डिसेंबर 2022 रोजी स्टॉक एक्सचेंज निर्देशांक BSE आणि NSE वर सूचीबद्ध केले जातील. धर्मराज क्रॉप गार्ड कंपनीच्या IPO मध्ये 216 कोटी रुपये किमतीचे फ्रेश इश्यू शेअर्स आणि 14,83,000 इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्री केले जातील. या कंपनीच्या IPO मध्ये किंमत बँड प्रति शेअर 216-237 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली होती. या धर्मराज क्रॉप कंपनीने एलारा इंडिया अपोरच्यूनिटीज फंड, राजस्थान ग्लोबल सिक्युरिटीज, आणि रेझोनन्स अपोरच्यूनिटीज फंड यासह अँकर गुंतवणूकदारांकडून IPO पूर्वी 74.95 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Money From IPO of Dharmraj Crop Guard Share price has increased and touched Premium price in Gray market on 5 December 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON