
Money Making Stock | भारत सरकारच्या मालकीची प्रसिद्ध जहाज बांधणी कंपनी Mazagon Dock Shipbuilders/MDL चे शेअर्स सोमवारच्या इंट्राडे ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वधारले होते. MDL कंपनीच्या शेअरने 819.25 रुपये ही आपली नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती.
5 दिवसांत दिला 29 टक्के परतावा :
मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये MDL कंपनीच्या स्टॉकमध्ये 29 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. 27 सप्टेंबर 2022 रोजी MDL चा स्टॉक 412.25 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होता, त्यात मागील सहा आठवड्यात MDL 99 टक्के इतकी जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. BSE निर्देशांकावरील उपलब्ध अधिकृत डेटा नुसार S&P BSE सेन्सेक्समध्ये 4.5 टक्क्यांची वाढ झाली होती, या तुलनेत मागील तीन महिन्यांत MDL कंपनीचे स्टॉक 196 टक्क्यांनी वधारले आहेत.
कंपनीबद्दल थोडक्यात :
MDL कंपनी मुख्यतः आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारचे जहाज बांधण्याचे काम करते. सोबत त्यांची दुरुस्ती आणि संबंधित अभियांत्रिकी उत्पादनाचे इतर सर्व कामही कंपनी करते. भारतीय नौदलासाठी MDL कंपनी विध्वंसक आणि पारंपारिक पाणबुड्या बनवण्याचे काम करते. MDL या कंपनीकडे भारतातील एकमेव शिपयार्ड आहे. गुरुवार 10 नोव्हेंबर 2022 रोजी MDL कंपनीने आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे, ज्यात 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत जाहीर केलेल्या आर्थिक निकालांवर चर्चा करून अंतरिम लाभांश जाहीर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.