
Money Making Stock | Neuland Labs कंपनीचा स्टॉक गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत ट्रेड करत होता. या शेअर मध्ये अप्रतिम तेजी पाहायला मिळाली होती, त्यामुळे या स्टॉकमधे कमालीची वाढ पाहायला मिळाली होती. न्यूलँड लॅबोरेटरीज कंपनीच्या शेअर्सनी गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1,701.80 रुपये ही आपली 10 महिन्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. या स्टॉकमध्ये 20 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला होता.
कंपनीचा तिमाही नफा :
कंपनीचा प्रॉफिट मार्जिन देखील वर्ष-दर-वर्ष प्रमाणे 690 अंकांनी वाढला आहे. या कंपनीने जुलै-सप्टेंबर 2022 या तिमाहीत व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफी/EBITDA मार्जिनमध्ये 23.6 टक्क्याची विक्रमी नोंद केली आहे. गेल्या तिमाहीत या कंपनीचा PAT 88.6 टक्क्यांनी वाढून 38.30 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
कंपनीचा शेअर्सची उच्चांक आणि नीचांक किंमत :
जानेवारी 2022 पासून न्यूलँड्स लॅब्स कंपनीचे शेअर्स उच्च किंमत पातळीवर ट्रेड करत होते. S&P BSE सेन्सेक्स निर्देशांक दुपारी 02:23 वाजता 60,431 ट्रेड करत होता, त्यावेळी त्यात जवळपास 1 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. 3 डिसेंबर 2021 रोजी या कंपनीच्या शेअरने 1,875 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.