12 December 2024 11:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Money From IPO | 1 दिवसात लॉटरी लागण्याचे संकेत, शेअरचा GMP 75 रुपये प्रीमियमवर, IPO बद्दल जाणून घ्या

Money From IPO

Money From IPO | Archean Chemicals या स्पेशॅलिटी मरीन केमिकल निर्मिती करणाऱ्या कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाल्याच्या पहिल्या दिवशीच 30 टक्के सबस्क्राइब झाला आहे. या केमिकल कंपनीच्या आयपीओची मध्ये शेअरची किंमत 386-407 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. Archean Chemicals कंपनी IPO 11 नोव्हेंबर 2022 पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला राहील. या कंपनीच्या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये गुंतवणूकदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 75 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.

Archean Chemicals कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक 480 रुपयांच्या किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. ग्रे मार्केटमध्ये Archean Chemicals कंपनीचे शेअर्स 75 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. Archean Chemicals कंपनीचे शेअर्स 21 नोव्हेंबर 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/BSE आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज/NSE निर्देशांकावर सूचीबद्ध होण्याचा अंदाज आहे. या कंपनीचे शेअर्स 407 रुपयेच्या अप्पर किंमत बँडमध्ये आणि 75 रुपये या ग्रे मार्केट प्रीमियम किमतीमध्ये वाटप केले गेले तर हे शेअर्स 482 रुपये किमतीवर सूचीबद्ध होतील.

IPO बद्दल तपशील थोडक्यात :
Archean Chemicals कंपनीच्या IPO मध्ये 805 कोटी रुपयांच्या फ्रेश इक्विटी शेअर्सचा समावेश होता. कंपनीचे प्रमोटर्स आणि गुंतवणूकदारांनी 1.61 कोटी शेअर्सची ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्री केली आहे. या IPO मध्ये गुंतवणूकदार किमान 36 शेअर्ससाठी बोली लावू शकतात. या कंपनीने सोमवारी किरकोळ गुंतवणूकदारांकडून IPO च्या माध्यमातून 658 कोटी रुपये जमा केले आहेत. या कंपनीने 407 रुपये प्रति शेअर किमतीत 1,61,67,991 शेअर्स अँकर गुंतवणूकदारांना वितरीत केले आहेत. गोल्डमन सॅक्स, अबू धाबी गुंतवणूक प्राधिकरण, बीएनपी परिबा, सोसायटी जनरल, गव्हर्नमेंट पेन्शन फंड ग्लोबल, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, डीएसपी स्मॉल कॅप फंड, टाटा म्युच्युअल फंड, एसबीआय एमएफ, निप्पॉन इंडिया एमएफ आणि आदित्य बिर्ला सनलाइफ इन्शुरन्स यासारख्या दिग्गज गुंतवणूक संस्थानी राखीव ठेवलेल्या कोट्यात मोठी गुंतवणूक केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Archean Chemicals company IPO has given huge opportunity to investors to earn Money From IPO on 11 November 2022.

हॅशटॅग्स

Money From IPO(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x