
MRF Share Price | ‘एमआरएफ लिमिटेड’ या टायर कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही काळापासून पडझड पाहायला मिळत आहे. गुरुवार दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी हा स्टॉक 1.36 टक्के घसरणीसह 86,466.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक दिवसाच्या उच्चांकावरून 2,826.25 रुपये म्हणजेच 3.1 टक्के खाली आला होता. काल हा स्टॉक 87659.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. नुकताच एमआरएफ लिमिटेड कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. एमआरएफ कंपनीने 2022-23 या आर्थिक वर्षांसाठी प्रति इक्विटी शेअर 30 टक्के दुसरा अंतरिम लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, MRF Share Price | MRF Stock Price | BSE 500290 | NSE MRF)
कंपनीची कामगिरी :
एमआरएफ टायर कंपनी एक प्रोफीटेबल कंपनी असून कंपनीने नुकताच आपले डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. डिसेंबर 2022 तिमाहीत एमआरएफ कंपनीच्या निव्वळ नफ्यात 17 टक्के वाढ झाली असून कंपनीने 174.83 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत एमआरएफ कंपनीने 149.39 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या वर्षीच्या तिमाही काळात कंपनीचा खर्च वाढला असून 5,484.72 कोटी रुपयेवर पोहचला आहे. मागील वर्षी कंपनीचा खर्च 4,787.33 कोटी रुपये होता. डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीचे परिचालन उत्पन्नही वाढून 5,644.55 कोटी रुपयेवर गेले आहे, जे मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत 4,92013 कोटी रुपये होते.
कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
चेन्नईस्थित एमआरएफ लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय टायर निर्मिती करणारी कंपनी आहे. MRF कंपनीचे पूर्ण नाव म्हणजे मद्रास रबर फॅक्टरी आहे आहे. ही कंपनी मुख्यतः ट्रेड ट्यूब, कन्व्हेयर बेल्ट, पेंट्स खेळणी तसेच स्पोर्ट्स संबंधीत सामान, मोटर स्पोर्ट्स उत्पादने बनवण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे. 1940 च्या दशकात एमआरएफ कंपनी रबर बलून कारखाना म्हणून सुरू झाली होती, आणि त्याकाळात कंपनी 14,000 रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरू करण्यात आली होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.