
MSR India Share Price | शेअर बाजारातील जबरदस्त चढ उतारा दरम्यान ‘एमएसआर इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकमध्ये सतत अप्पर सर्किट लागत आहे. शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.98 टक्के वाढीसह 14.29 रूपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘एमएसआर इंडिया लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. याआधी बुधवारीही हा स्टॉक 20 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 14 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या घोषणेनंतर शेअरमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, MSR India Share Price | MSR India Stock Price | BSE 508922)
शेअरमध्ये जबरदस्त तेजी :
आज बीएसई निर्देशांकावर ‘एमएसआर इंडिया’ कंपनीच्या स्टॉकची किंमत 14.29 रुपये आहे. आदल्या दिवसाच्या बंदच्या तुलनेत स्टॉक आज 20 टक्के वाढला आहे. मागील वर्षी 16 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 21.15 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 18 ऑक्टोबर 2022 रोजी या ‘MSR इंडिया’ कंपनीच्या शेअरने 6.65 रुपये ही नीचांक पातळी स्पर्श केली होती.
स्टॉक वाढीचे कारण :
‘एमएसआर इंडिया लिमिटेड’ कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 14 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल जाहीर केले जाणार आहे. याशिवाय कंपनीचे संचालक अध्यक्षांच्या व्यवसाय वाढीवर विचारमंथन करतील. ‘एमएसआर इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकने मागील तीन महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 45 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘एमएसआर इंडिया’ कंपनीचा स्टॉक मागील एका वर्षात 10 टक्के कमजोर झाला आहे. तर या वर्षी स्टॉक YTD आधारे 62 टक्के वर गेला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.