14 December 2024 3:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

Tax Saving Options | इन्कम टॅक्स बचतीच्या 5 फायद्याच्या योजना | अशी करा तुमच्या पैशांची बचत

Tax Saving Options

Tax Saving Options | जसजसे तुमचे उत्पन्न वाढत जाते, तसतसा तुमचा करही वाढत जातो. देशाचा आयकर कायदा नागरिकांना अनेक मार्ग देतो ज्याद्वारे तुम्ही कर वाचवू शकता. आयकर कायदा, 1962 मध्ये अनेक नियम आहेत, ज्याच्या मदतीने आपण आपला कर वाचवू शकता. अधिक उत्पन्न असूनही कर वाचविण्यासाठी कोणत्या पद्धतींचा अवलंब करता येईल, हे समजून घेऊ.

करमुक्त परतावा मिळू शकतो :
केंद्र सरकारच्या अशा अनेक योजना आहेत, जिथे तुम्हाला करमुक्त परतावा मिळू शकतो. या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला करसवलत मिळते. त्याचबरोबर या योजनांवर गुंतवणूक करून मिळणारे उत्पन्न करमुक्त असते.

पीपीएफ :
पीपीएफ अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंडावर ८ टक्के दराने व्याज मिळते. तुम्ही वार्षिक किमान ५०० रुपयांची गुंतवणूक करू शकता. तुम्ही कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ खाते उघडू शकता. आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत तुम्हाला पीपीएफमध्ये वार्षिक दीड लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर करसवलत मिळू शकते. पीपीएफवरील व्याजदरांचा दर तिमाहीला आढावा घेतला जातो.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी :
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) हा गुंतवणुकीचा उत्तम पर्यायही मानला जातो. तुम्ही निवृत्त झाल्यानंतरही ईपीएफ फंड काढू शकता. जर तुम्ही सलग 5 वर्षे ईपीएफमध्ये गुंतवणूक केली तर त्यानंतर तुम्ही ईपीएफ फंड काढू शकता. गुंतवणूक, परतावा, मॅच्युरिटी हे करमुक्त असतात.

सुकन्या समृद्धी योजना :
सुकन्या समृद्धी योजना ही मुलींसाठी केंद्र सरकारची अल्पबचत योजना आहे. बेटी बचाओ-बेटी पढाओ योजनेअंतर्गत सुरू करण्यात आला आहे. त्यावर 8.5 टक्के व्याज मिळतं. यामध्ये करसवलतीसह मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर त्याचे उत्पन्न करमुक्त असते.

एनपीएस :
राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) ही सेवानिवृत्ती बचत योजना आहे. या सरकारी योजनेत कलम ८०सी अंतर्गत वर्षाला दीड लाख रुपयांची तर कलम ८०सीसीडी (१ ब) अंतर्गत अतिरिक्त ५० हजार रुपयांची गुंतवणूक करता येते. त्याच्या उत्पन्नावर आणि मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम करमुक्त असते.

यांतही कर लाभ :
घरभाडे भत्ता, रजा प्रवास भत्ता, गृहकर्ज व्याज आणि मुलांच्या शैक्षणिक कर्जाच्या व्याजावर करसवलत आहे. कलम ८० जी अंतर्गत देणग्या आणि कलम ८० डी अंतर्गत आरोग्य विमा प्रीमियम देखील कर लाभ मिळतात. गृहकर्जाच्या व्याजावरील सवलतीची मर्यादा दोन लाख रुपये असून शैक्षणिक कर्जाच्या व्याजावर करसवलतीची मर्यादा नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Tax Saving Options suggested by experts check details 09 July 2022.

हॅशटॅग्स

#Tax Saving Options(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x