
Mufin Green Finance Share Price | गुंतवणुकदारांना अल्पावधीत मालामाल करणाऱ्या ‘मुफिन ग्रीन फायनान्स’ या कंपनीचे शेअर्स 2 तुकड्यामध्ये विभाजित होणार आहे. स्टॉक स्प्लिटसाठी ‘मुफिन ग्रीन फायनान्स’ कंपनीने रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. गुंतवणूकदारांसाठी खुशखबर अशी की, स्टॉप स्प्लिटची एक्स-स्प्लिट तारीख 10 दिवसांनंतर आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांना जास्त वाट पाहावी लागणार नाही. आता जर तुम्ही शेअर खरेदी केले, तुम्हाला स्टॉक स्प्लिट चा लाभ मिळू शकतो. चला तर मग कंपनीबद्दल सविस्तर तपशील जाणून घेऊ. (Mufin Green Finance Limited)
स्टॉक स्प्लिट रेकॉर्ड तारीख :
‘मुफिन ग्रीन फायनान्स’ कंपनीने सेबीला नुकताच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीबाबत माहिती दिली आहे. कंपनीने सांगितले आहे की, कंपनीच्या संचालकांनी बैठकीत 2 रुपये दर्शनी मूल्य असलेले कंपनीचे शेअर 2 तुकड्यामध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टॉक स्प्लिटनंतर ‘मुफिन ग्रीन फायनान्स’ कंपनीच्या एका शेअरचे दर्शनी मूल्य 1 रुपये होईल. ‘मुफिन ग्रीन फायनान्स’ कंपनीने स्टॉक स्प्लिटसाठी 15 एप्रिल 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे.
1 वर्षात 257.41 टक्के परतावा :
गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी ‘मुफिन ग्रीन फायनान्स’ कंपनीचे शेअर्स 1.91 टक्के वाढीसह 240.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 1.58 टक्क्यांच्या वाढीसह 235.10 रुपयांवर ट्रेड करत होता. 2023 या वर्षात शेअरची किंमत फक्त 0.73 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एक वर्षात ‘मुफिन ग्रीन फायनान्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 257.41 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने 36.17 टक्के परतावा दिला आहे. 3 वर्षांपूर्वी ‘मुफिन ग्रीन फायनान्स’ कंपनीचे शेअर्स 13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. याकाळात शेअरची किंमत 1600 टक्क्यानी वाढली आहे. ‘मुफिन ग्रीन फायनान्स’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 286.80 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 59.90 रुपये प्रति शेअर होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.