 
						Mufin Green Share Price | मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड या नॉन बँकिंग फायनान्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदर तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स भारतीय शेअर बाजारात फक्त बीएसई इंडेक्सवर सूचीबद्ध आहेत, मते आता या कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर देखील सूचीबद्ध केले जाणार आहे.
मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, मफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6 नोव्हेंबर 2023 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध केले जाणार आहेत. शुक्रवार दिनांक 4 नोव्हेंबर 2023 रोजी मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.91 टक्के वाढीसह 129.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीचे इक्विटी शेअर्स 06 नोव्हेंबर 2023 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर ट्रेडिंगसाठी सूचीबद्ध होणार आहेत. NSE द्वारे मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सचे नामकरण ‘Muffin’ असे करण्यात आले आहेत.
मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड कंपनीचे एकूण 1,50,99,5172 शेअर्स NSE इंडेक्सवर सूचीबद्ध केले जाणार आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अपर सर्किटसह 129.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,950 कोटी रुपये आहे.
मागील काही दिवसांपासून मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्समध्ये सतत अप्पर सर्किट हीट करत आहेत. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 27 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात हा कंपनीच्या शेअरची किंमत 50 टक्क्यांनी वाढली आहे.
मागील सहा महिन्यांत मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड स्टॉक 220 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 300 टक्के मजबूत झाले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुफिन ग्रीन फायनान्सला प्री-पेड इन्स्ट्रुमेंट्स जारीकर्ता म्हणून काम करण्याचा परवाना बहाल केला आहे. आता या कंपनीला आपल्या वित्तीय सेवां प्रदान करण्यासाठी ‘सुपर अॅप’ सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		