15 December 2024 9:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Multibagger IPO | या आयपीओने गुंतवणूकदारांना केले मालामाल, 110 टक्के परतावा, स्टॉक पुढेही फायद्याचा

Multibagger IPO

Multibagger IPO | जिथे एकीकडे Zomato, Paytm, Cartrade सारख्या नव्या युगातील टेक कंपन्यांच्या आयपीओने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान केले आहे. दुसरीकडे, ईझीमायट्रिप या कंपनीच्या आयपीओने आपल्या गुंतवणूकदारांना 110 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

मल्टीबॅगर IPO :
ईझीमायट्रिप किंवा Easy Trip Planners ह्या कंपनीचा IPO हा टेक्नॉलॉजी क्षेत्रातील कंपनीच्या आयपीओ पैकी एक आहे ज्याने 19 मार्च 2021 रोजी शेअर बाजारात नोंदणी झाल्यापासून त्यांच्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. तर Zomato, Paytm, Cartrade Tech या सारख्या आजच्या युगातील तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या आयपीओने गुंतवणूकदारांचे वाटोळे करून ठेवले आहे. ईझीमायट्रिप कंपनीने आयपीओ लिस्टिंग झाल्यापासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 110 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

EaseMyTrip स्टॉकचा बद्दल सविस्तर :
ईझीमायट्रिप चा स्टॉक बाजारात गुंतवणुकीसाठी मार्च 2021 मध्ये खुला करण्यात आला होता. शेअर ची किंमत 186 रुपये ते 187 प्रति इक्विटी शेअर तर्वण्यात आली होती. 19 मार्च 2021 रोजी ईझीमायट्रिपचे शेअर्स भारतीय शेअर बाजारात सुमारे 13 टक्के प्रीमियमवर नोंदवले गेले. शेअर्स BSE वर 206 रुपये प्रति इक्विटी शेअर वर सूचीबद्ध झाले होते, तर NSE वर 212 रुपये प्रति इक्विटी शेअर वर सूचीबद्ध होते. मंगळवारी, ईझीमायट्रिप शेअरची किंमत NSE वर 393.50 रुपये होती आणि दिवसा अखेर याच किमतीवर शेअर बंद झाला. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांना समभाग वाटप करण्यात आले त्यांना आता पर्यंत 110 टक्के परतावा मिळाला आहे.

कंपनीचा नफा :
ईझीमायट्रिपने 2022 च्या पहिल्या तिमाहीत 14.9 कोटी रुपये वरून 33.7 कोटी रुपये इतका नफा नोंदवला आहे. कंपनीचा कर वजा केल्यानंतर येणाऱ्या नफ्याचे प्रमाण 125 टक्के नोंदवले गेले आहे. प्रवासी सेवा प्रदात्याकडून मिळणाऱ्या एकूण बुकिंग महसूल मध्ये 356.7 कोटीं रुपयेवरून 1,663.1 कोटीपर्यंत वाढ झाली आहे. कंपनीच्या नफ्यात प्रती वार्षिक सरासरी वाढ 366 टक्के नोंदवली गेली आहे. जून 2022 च्या तिमाहीत, कंपनीने एअर सेगमेंट बुकिंगमध्ये 212 टक्के वाढ नोंदवली होती, हॉटेल नाईट बुकिंगमध्ये 409 टक्के वाढ नोंदवली होती आणि ट्रेन, बस आणि इतरांमध्ये 132 टक्के वाढ नोंदवली होती.

इतके जबरदस्त प्रदर्शन केल्यानंतर ईझीमायट्रिप कंपनी भारतातील पहिल्या 100 युनिकॉर्नच्या एलिट क्लबमध्ये सामील झाली आहे. सप्टेंबर 2021 रोजी कंपनीचे बाजार भांडवल 1 बिलियन डॉलर्स एवढे नोंदवले गेले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger IPO stock EaseMyTrip share price return on 4 August 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x