
Multibagger Stocks| Accuracy Shipping कंपनीचे शेअर्स अश्या काही मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे, हे ज्यांनी मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या कंपनीने मागील दोन वर्षात आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 700 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. ह्या कंपनीच्या गुंतवणुकदारांसाठी मागील वर्ष कमाईची दृष्टीने जबरदस्त होते. या कंपनीची एकूण कामगिरी अप्रतिम राहिली आहे.
Accuracy shipping ही एक स्मॉल कॅप कंपनी असून आपल्या गुंतवणूकदारांना कमालीचा परतावा देत आहे. या कंपनीनं NSE निर्देशांकावर मागील एका वर्षात 95 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली आहे. या दरम्यान, कंपनीच्या एका शेअरची किंमत 132.25 रुपये वरून वाढून 254.90 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या कंपनीच्या चालू वर्षातील कामगिरीचे निरीक्षण केले तर कंपनीच्या शेअरच्या किमतीमध्ये 17 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसेल. त्याच वेळी, 11 डिसेंबर 2020 पासून या कंपनीच्या शेअर्सच्या किमती 715.68 टक्क्यांनी वर गेल्या आहेत. कंपनीच्या शेअर ची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 303 रुपये आहे, त्याच वेळी, 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 128 रुपये होती.
टारगेट प्राईस :
या शेअर्सच्या डेटाचे निरीक्षण केल्यास आपल्याला कळेल की, “स्टॉक दैनिक चार्टवर तेजी दाखवत आहे, आणि त्यात पुढील काळात जबरदस्त तेजी येण्याची शक्यता आहे. पुढील येणाऱ्या काळात या कंपनीचे शेअर्स 320 रुपये किमतीला स्पर्श करू शकतात. त्याच वेळी, दीर्घकाळात ह्या कंपनीचे शेअर 360 रुपये किमतीला स्पर्श करू शकतात”. दुसरीकडे, चॉईस ब्रोकिंग फर्मचे म्हणने आहे की “हा स्टॉक चार्ट पॅटर्नवर जबरदस्त तेजी दाखवत आहे, आणि पुढील काळात ह्यात तेजी येण्याचे संकेत दिसत आहेत. अल्पावधीत कंपनीचे शेअर्स 290 रुपये ते 300 रुपये किमतीवर जातील, असा तज्ञांचा अंदाज आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 320-360 रुपये या टारगेट किंमत साठी खरेदी करावे, आणि 230 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवावा असा सल्ला दिला आहे.
शेअर्स मधील वाढ सविस्तर :
मागील एका महिन्यापूर्वी BSE निर्देशांकावर या कंपनीच्या शेअरची किंमत 201 रुपये किमतीवर ट्रेड करत होती, त्यात वाढ होऊन आता हा स्टॉक 259 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच या कालावधीत Accuracy Shipping कंपनीच्या शेअर्समध्ये 29 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी, 6 महिन्यांपूर्वी या कंपनीचे शेअर 233 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही सहा महिन्यापूर्वी ह्या Accuracy Shipping कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असती तर तुम्हाला आतापर्यंत 10 टक्के अधिक परतावा मिळाला असता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.