
Multibagger Stocks | रासायनिक उद्योगात गुंतलेल्या या कंपनीच्या शेअर्सनी मागील काही वर्षांत आपल्या भागधारकांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीचे नाव आहे “गुजरात फ्लोरोकेमिकल्स लिमिटेड”. या केमिकल कंपनीच्या शेअर्सच्या बाबतीत गुंतवणुकदार आणि शेअर बाजारातील तज्ञ सकारात्मक असून त्यांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील येणाऱ्या काळात या केमिकल कंपनीचे शेअर 4000 रुपयांच्या पुढे जाऊन शकतात,असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गुजरात फ्लोरोकेमिकल्सच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3868.45 रुपये आहे.
खरेदी रेटिंगसह 4270 रुपये टारगेट प्राईस :
भारतातील प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म आणि गुंतवणूक कंपनी ICICI सिक्युरिटीजने गुजरात फ्लोरोकेमिकल्स कंपनीच्या शेअर्सवर “बाय” रेटिंग दिली असून खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आणि या कंपनीच्या शेअर्ससाठी 4270 रुपये टारगेट प्राइस निश्चित केली आहे. या ब्रोकरेज हाऊसने आर्थिक वर्ष 2023-2024 साठी गुजरात केमिकल कंपनीच्या EPS मध्ये अंदाजे 2-10 टक्के वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. 27 सप्टेंबर 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर गुजरात फ्लोरोकेमिकल्सचे शेअर्स 3633.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि दिवसा अखेर वाढीसह स्टॉक क्लोज झाले होते. या केमिकल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 1711 रुपये होती. ही कंपनी फ्लोरोपॉलिमर आणि बॅटरी रसायनांमधील वाढत्या मागणीच्याबाबत सकारात्मक आहे.
300 रुपये ते 3000 रुपयांची वाटचाल :
गुजरात फ्लोरोकेमिकल्स लिमिटेडच्या शेअर्सनी मागील अडीच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. 22 मे 2020 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे निर्देशंकावर या कंपनीचे शेअर्स 293.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 27 सप्टेंबर 2022 रोजी BSE निर्देशांकावर Gujrat FeroChemical चे शेअर्स 3649.85 रुपये किमतीवर बंद झाले होते. जर तुम्ही 22 मे 2020 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयेची गुंतवणूक केली असती, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 12.40 लाख रुपये झाले असते. गुजरात फ्लोरोकेमिकल्सच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना चालू वर्षात 47 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.