
Multibagger Stock | मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध आघाडीची उद्योग कंपनी सारेगामा इंडिया कंपनीने सप्टेंबर 2022 तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले दिले आहेत. या वर्षी आतापर्यंत सारेगामा इंडिया कंपनीचे शेअर्स 28 टक्के पडले आहेत. मागील 3 वर्षांत सारेगामा इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 1500 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. सप्टेंबर 2022 मधील तिमाहीच्या अप्रतिम निकालानंतर सारेगामा इंडिया कंपनीच्या शेअर्सवर बाजारातील तज्ञांनी तेजीचा कल दिला आहे. पुढील येणाऱ्या काळात या कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
1 लाख रुपयेवर 19.50 लाख परतावा :
27 मार्च 2020 रोजी सारेगामा इंडिया कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/BSE निर्देशांकावर 19.98 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 7 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 389.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये 1500 टक्क्यांहून जास्त वाढ झाली आहे. जर तुम्ही 27 मार्च 2020 रोजी सारेगामा इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 19.50 लाख रुपये झाले असते. सारेगामा इंडिया कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 550.59 रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 346.30 रुपये होती.
स्टॉक रेटिंग अपग्रेड :
डोमेस्टिक ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने सारेगामा इंडिया कंपनीच्या शेअर्सची रेटिंग अपग्रेड केली आहे. ब्रोकरेज फर्मने या कंपनीच्या शेअर्सवर होल्ड रेटिंग दिली होती, त्यात बदल करून आता बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ICICI सिक्युरिटीजने अंदाज व्यक्त केला आहे की, सारेगामा इंडिया कंपनीचे शेअर्स पुढील काळात 460 रुपये पर्यंत जाऊ शकतात. त्याचवेळी ब्रोकरेज हाऊस JM फायनान्शियल फर्मने सारेगामा इंडिया कंपनीच्या शेअर्ससाठी 450 रुपयांची लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.
सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत या कंपनीचे एकत्रित सेल्स 189 कोटी रुपये होती. जुलै-सप्टेंबर 2022 तिमाहीत सारेगामा इंडिया कंपनीचे एकत्रित सेल्स वार्षिक 30 टक्के वाढून 189.16 कोटी रुपये झाले आहे. त्याच वेळी, सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात 36 टक्क्यांची वाढ होऊन एकूण प्रॉफिट 46 कोटी रुपयेवर गेला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.