 
						Multibagger Stocks | आज आपण ज्या कंपनी बद्दल माहिती घेणार आहोत त्या कंपनीचे नाव आहे एजिस लॉजिस्टिक लिमिटेड. 1 जानेवारी 1999 रोजी या कंपनीचे शेअर बाजारात पदार्पण झाले होते. तेव्हापासून 19 ऑगस्ट 2022 पर्यंत.या कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 42,400 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली आहे. आता ही कंपनी आपल्या भागधारकांना लाभांश वितरीत करणार असल्याचे जाहीर केले आहे.
शेअर बाजारात गुंतवणुक करण्यासाठी आपल्याकडे संयम असणे गरजेचे आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने किंवा भागधारकांने फंडामेंटल्स तपासून पैसे लावले असतील तर त्याने त्या स्टॉकमधून नफा कमावण्यासाठी संयम राखला पाहिजे. सर्वसाधारणपणे असे दिसून येते की अनेक शेअर्स बरेच वर्ष खूप कमी परतावा देत देतात. पण जेव्हा हे शेअर्स तेजीत येतात तेव्हा गुंतवणुकदारांचे नशीब रातोरात बदलून जाते. एजिस लॉजिस्टिक लिमिटेडच्या शेअर्सच्या बाबतीतही असेच दिसून आले आहे. या कंपनीच्या शेअरने बाजारात पदार्पण केल्यापासून आतापर्यंत 42,400 टक्के परतावा मिळवून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना आणि भागधारकांना लाभांश देणार असल्याचे जाहीर केले आहे.
रेकॉर्ड डेट काय आहे?
कंपनीच्या संचालक मंडळाने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी पात्र भागधारकांना आणि गुंतवणूकदारांना 1 रुपयांच्या दर्शनी मूल्य किमतीवर 1.50 रुपये लाभांश देण्याचे जाहीर केले आहे,” असे कंपनीने दिलेल्या माहितीत म्हटले आहे. कंपनीने 23 ऑगस्ट ही तारीख लाभांश जाहीर करण्यासाठी रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे. म्हणजेच आज कंपनी एक्स-डिव्हिडंडप्रमाणे ट्रेड करत आहे. 9 सप्टेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी कंपनी लाभांश वितरण करेल.
भरघोस परताव्यामुळे गुंतवणूकदार हैराण :
1 जानेवारी 1999 रोजी या कंपनीने शेअर बाजारात पदार्पण केल्यापासून 19 ऑगस्ट 2022 पर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 42,400 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. 1 जानेवारी 1999 रोजी NSE मध्ये कंपनीचा शेअर फक्त 60 पैसे वर ट्रेड करत होता. आता ह्या शेअरची किंमत 255 रुपये प्रती शेअर पर्यंत गेली आहे. म्हणजेच, जर तुम्ही 1 जानेवारी 1999 रोजी या शेअर मध्ये एक लाख रुपये लावले असते, आणि शेअर्स होल्ड करून ठेवले असते तर आतापर्यंत तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर तब्बल 4.24 कोटी रुपयांचा नफा झाला असता. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 34.28 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मात्र, मागील काही वर्षात कंपनीच्या शेअर्स नी निराशाजनक कामगिरी केली होती त्यामुळे तो काळ भागधारकांसाठी निराशाजनक ठरला होता. सकारात्मक बातमी अशी आहे की एजिस लॉजिस्टिक लिमिटेडच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या भागधारकांना तब्बल 27.15 टक्के परतावा मिळवून दिला आहे. कंपनीच्या शेअर ची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 291 रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		